Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव द्या, नाहीतर आम्ही…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 26, 2026 | 03:20 PM
शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव द्या, नाहीतर आम्ही...; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव द्या, नाहीतर आम्ही...; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

Follow Us
Follow Us:

नाशिक : कांद्याला सध्या प्रति क्विंटल २००-३०० रुपये एवढा कमी भाव मिळत असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

 

कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. यावेळी रास्ता रोकोही करण्यात आला. या शेतकरी महामोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना (उबाठा) आमदार अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, खा. शोभाताई बच्छाव, खा. भगरे गुरुजी, नाशिक ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भारत टाकेकर, रमेश कहांडोळे, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू खैरे तसेच महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसी बळाचा वापर करून नेत्यांना ताब्यात घेतले, मात्र शेतकऱ्यांचा संघर्ष दडपून टाकता येणार नाही. “सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

हे सुद्धा वाचा : मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा, पेट्रोल-डिझेलची दरवाढ तात्काळ मागे घ्या, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महागाईने शेतकऱ्यांना जगणे, शेती करणे कठीण झाले आहे, शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कांद्याचे भाव पडलेले आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे पण सरकार मात्र झोपेतून जागे होत नाही. कांद्याची शासकीय खरेदी करण्याची घोषणा केली पण अद्याप कांदा खरेदी सुरु झालेली नाही. कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातूनच झाली पाहिजे. कांदा खरेदीत व्यापाऱ्यांचे भले करु नका, शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा खोटारडा माणूस आहे, त्यांनी आजपर्यंत केलेल्या घोषणा कधीच पूर्ण केलेल्या नाहीत. शेतकरी अडचणीत असताना भाजपा सरकार मदत करत नाही. बळीराजाला छळणाऱ्या भाजपा सरकारला खाली खेचल्याशिवाय आता गत्यंतर नाही. काँग्रेस पक्ष व संपूर्ण महाविकास आघाडी शेतकऱ्यांबरोबर असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has warned the government over the minimum support price of onion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • onion

संबंधित बातम्या

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा
1

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

‘MPSC भरती घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा’; हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप, ऑनलाइन परीक्षा रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
2

‘MPSC भरती घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा’; हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप, ऑनलाइन परीक्षा रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार
3

‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
4

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.