Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Protest : ‘घाबरलेला माणूस आज नाहीतर उद्या मरेल’, खर्गेंचा केंद्रावर निशाणा, दिल्ली मेट्रो-रेल्वे निर्बंधांवरून राजकारण तापलं

Delhi Protest : इंडिया आघाडीचे नेते निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, दिल्लीतील मेट्रो आणि रेल्वे सेवांवरील निर्बंधांवरून मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर टीका केली. सर्वोच्च न्यायालयानेही सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंधांचा पुनर्विचार करण्यास सांगितले.

  • By विवेक
Updated On: Oct 09, 2026 | 08:10 PM
Mallikarjun Kharge

Mallikarjun Kharge

Follow Us
Follow Us:
  • इंडिया आघाडीचे नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार.
  • दिल्लीतील मेट्रो आणि रेल्वे सेवांवरील निर्बंधांवरून मल्लिकार्जुन खर्गे यांची सरकारवर टीका.
  • सामान्य नागरिकांवर परिणाम करणाऱ्या निर्बंधांचा पुनर्विचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना.
 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता देशभरातून मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजधान दिल्लीत आधी AISF आणि इंडिया आघाडीकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. अश्यातच, उद्या (शनिवार, 10 ऑकटोबर) कॉक्रोच जनता पार्टीकडूनही जंतर मंतर वर जोरदार प्रदर्शन होणार आहे. तत्पूर्वीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. (Delhi Protest)

विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना खरगेंनी प्रतिक्रिया दिली.

मेट्रो आणि रेल्वे सेवांवरील निर्बंधांवरून खर्गेंचा हल्लाबोल

दिल्लीतील मेट्रो स्थानकं बंद ठेवणं आणि रेल्वे सेवा रद्द केल्याच्या मुद्द्यावरून मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर टीका केली. “ते घाबरले आहेत. घाबरलेला माणूस आज नाही तर उद्या मरेल,” असं खर्गे म्हणाले. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांबाबत विरोधकांच्या अनेक चिंता असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत खर्गे यांनी आरोप केला की, निवडणूक प्रक्रियेतील कथित चुका दुरुस्त करण्यासाठी पुरेशी पावलं उचलण्यात आलेली नाहीत. इतर निवडणूक आयुक्तांनीही या मुद्द्यांवर अनेकदा पत्र लिहिल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांनी ‘व्होट चोरी’ आणि ईव्हीएममधील कथित अनियमिततांचा मुद्दा उपस्थित केला असून, हा विषय विरोधक अनेक दिवसांपासून मांडत असल्याचं खर्गे म्हणाले.

इंडिया आघाडीची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट

इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एकत्र आले होते. निवडणूक प्रक्रियेबाबतच्या तक्रारी आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजाविषयीच्या चिंता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर मांडण्याची विरोधकांची भूमिका आहे.

काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. चर्चेनंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

दिल्लीतील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या प्रवासावर परिणाम करणाऱ्या निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. न्यायालयाने प्रशासनाला निर्बंधांचा पुनर्विचार करण्यास सांगत, ‘मेट्रो आणि रेल्वे सेवा पूर्णपणे थांबवता येणार नसल्याचं म्हंटलं आहे.

मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केलं की, या सुनावणीचा मुख्य भर सामान्य नागरिकांची ये-जा आणि सार्वजनिक वाहतूक यांवर होणाऱ्या परिणामांवर आहे; आंदोलन करण्याच्या व्यापक अधिकारावर नाही. असे असतानाच एकीकडे निवडणूक प्रक्रियेवरून विरोधक आक्रमक असताना, दुसरीकडे दिल्लीतील वाहतूक निर्बंध आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा मुद्दाही चर्चेत आला आहे.

Supreme Court CJP Protest: सीजेपी आंदोलनाला दिलासा? रेल्वे, मेट्रो स्थानकांवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

Web Title: Delhi protest mallikarjun kharge delhi restrictions election commission protest vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Congress
  • INDIA Alliance
  • Mallikarjun Kharge

संबंधित बातम्या

Washim News: ‘मत वाचवा, देश वाचवा!’ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार
1

Washim News: ‘मत वाचवा, देश वाचवा!’ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा
2

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट
3

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
4

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.