Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : ‘आमच्याकडे या CM व्हा’, या पक्षाच्या नेत्याने दिली अजित पवार, शिंदेंना खुली ऑफर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांकडून पक्षप्रवेश करून घेतला जत आहे. त्यातच कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर दिली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 14, 2025 | 03:57 PM
'आमच्याकडे या CM व्हा', या पक्षाच्या नेत्याने दिली अजित पवार, शिंदेंना खुली ऑफर

'आमच्याकडे या CM व्हा', या पक्षाच्या नेत्याने दिली अजित पवार, शिंदेंना खुली ऑफर

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीला गळती लागली आहे. अनेक नेते कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. ऑपरेशन टायगरचीही जोरदार चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांकडून मोठ्या प्रमणात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला जात आहे. त्यातच कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर दिली आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिलीय. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. नाना पटोले यांनी सत्ताधारी नेत्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खास पद्धतीत होळीच्या शुभेच्छा दिल्या. याचवेळी काँग्रेसमध्ये या आणि सीएम व्हा! अशी ऑफर पटोलेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना दिलीय.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. त्यानंतर थेट मुख्यमंत्री व्हावं, अशी राजकीय होळीची ऑफर पटोलेंनी दिलीय. त्यामुळे जर दोन्ही नेत्यांनी ही ऑफर स्विकारली तर महायुती सरकार एकाच झटक्यात कोसळू शकतं. दरम्यान ही ऑफर देत असताना नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना डिवचलंय. महायुती सरकारमध्ये दोन्ही नेत्यांची अवस्था खराब झालीय.

भाजपचे मित्रपक्षांचे नेते अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे खूप त्रासलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व कारभार हा मुख्यमंत्री कार्यालयातून चालवला जाणार असल्याचा संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. फडणवीस दोन्ही नेत्यांना संपवण्याचं काम करत आहे. त्यामुळे माझी दोन्ही नेत्यांना खुली ऑफर आहे. जर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर आम्ही दोघांना मुख्यमंत्री बनवू. दोन्ही नेत्यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवू, असं नाना पटोले म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. ते खोटं बोलतात असा आरोप नाना पटोलेंनी केलाय. मुख्यमंत्री फडणवीस हे आमचे मित्र आहेत, ते सर्वांनाच माहिती आहे. त्यांना शुभेच्छा देतो, पण अलीकडच्या काळात फडणवीस खूप फेकत आहेत. खोट बोलतात पण मित्रांनी खोटं बोलू नये, असंही पटोले म्हणालेत.

Web Title: Congress leader nana patole offer to dcm eknath shinde and ajit pawar for cm post maharashtra politics latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Nana patole

संबंधित बातम्या

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!
1

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर
2

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप
3

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.