Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सचिन पायलट यांचा महायुतीवर हल्लाबोल; म्हणाले, आता तुमची…

धार्मिक मुद्द्यावरून लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या महायुती सरकारला लोक कंटाळले आहेत, अशी टीका राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 17, 2024 | 06:03 PM
सचिन पायलट यांचा महायुतीवर हल्लाबोल; म्हणाले, आता तुमची...

सचिन पायलट यांचा महायुतीवर हल्लाबोल; म्हणाले, आता तुमची...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक देशाला दिशा देणारी आहे. सबंध देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा देतो. त्यामुळे या निवडणुकीत सरकार बदलून महाराष्ट्र देशाला योग्य दिशा देईल. महाराष्ट्रातील जनतेला भ्रष्टाचारमुक्त आणि सामान्यांचे प्रश्न सोडविणारे सरकार पाहिजे. धार्मिक मुद्द्यावरून लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या महायुती सरकारला लोक कंटाळले आहेत, अशी टीका राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

महाराष्ट्रातील मतदार समंजस आणि हुशार आहेत. नागरिकत्वाच्या कर्तव्याची त्यांना जाण आहे. लोकसभेनंतर काही राज्यांतील निवडणुका एकत्रित घेण्यात येतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, एक देश एक निवडणूक, अशी घोषणा देणाऱ्या भाजपने महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीबरोबर घेतली नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने भाजपला हिसका दिल्याने ते एकत्रित निवडणूक घेण्यास घाबरले असतील, अशी टीका करून पायलट यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ताकद दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. चारसों पारच्या घोषणा देणाऱ्या भाजपला देशातील जनतेने २४० जागांवर आणले, असा टोला त्यांनी लगावला.

सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर बोला, असे आम्ही सांगितले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकार धर्माचा अजेंडा चालवत आहे. ट्रिपल इंजिन सरकार आहे तर या सरकारचे फायदे सांगा, या आमच्या आव्हानाला त्यांच्याकडे उत्तर नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचन, बेरोजगारी, महागाई, रोजगार, शिक्षण, शेतमालाला हमीभाव या सामान्य लोकांशी संबंधित प्रश्नांवर बोलण्याऐवजी भाजपचे नेते धर्मांधता पसरवत आहेत. घटनात्मक पदावर बसलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन सरकारच्या कामावर बोलण्याऐवजी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा देतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री वोट जिहाद आणि मताला धार्मिक युद्ध म्हणतात. हे त्यांच्या पदाला शोभा देणारे नाही. भाजपने नेहमीप्रमाणे पाकिस्तान, हिंदू -मुस्लिम, मंदिर-मशीद हाच प्रचार सुरू केला आहे. भाजपने नोटबंदी केली आणि देशातील महत्त्वाच्या संस्था विकल्या. धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या भाजपला पढोगे तो बढोगे हे सांगण्याची वेळ आली आहे, असे पायलट यांनी सांगितले.

इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग या माजी पंतप्रधानांनी देशासाठी काय केले, असे मोदी विचारतात. मात्र दहा वर्षांत स्वत: काय केले हे मोदी सांगत नाहीत. भाजपच्या मागील सरकारने एका दिवसात १४७ खासदारांना निलंबित केले. राहुल गांधींना बोलण्यास मनाई केली. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी मजबूत असून आता भाजपची मनमानी चालणार नाही. काँग्रेस सत्तेत असो किंवा विरोधात, मुद्द्यांवरून भटकणार नाही. आम्ही सरकारला प्रश्न विचारत राहू, असे पायलट यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : सोशल मीडियाद्वारे हायटेक प्रचारावर भर; उमेदवारांकडून बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

पायलट म्हणाले, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश या काँग्रेसशासित राज्यांत कल्याणकारी योजना यशस्वी ठरल्या आहेत. महिलांना आणि गरजूंना वेळेत मदत पोहोचली आहे. महायुतीच्या पंधराशे रुपयांत महिलांना मदत होणार नाही. ४५० रुपयांचा घरगुती गॅस सिलेंडर हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. लोकांना फसवून आणि गद्दारी करून आलेले हे महायुती सरकार सत्तेतून घालवण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार मोठ्या बहुमताने सत्तेत येणार आहे. ग्रामीण भागातील जनता महायुतीच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त करत आहेत, असेही ते शेवटी म्हणाले.

Web Title: Congress leader sachin pilot has criticized the mahayuti government nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 06:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • narendra modi
  • pune news
  • sachin pilot

संबंधित बातम्या

Local Body Elections: निवडणूक ड्युटीचा ‘ओव्हरलोड’; कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण
1

Local Body Elections: निवडणूक ड्युटीचा ‘ओव्हरलोड’; कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?
2

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?

लहू बालवडकरांच्या वाढदिवशी ‘विकासाचा धमाका’; महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रभाग ०९ साठी भव्य विकास आराखड्याची घोषणा
3

लहू बालवडकरांच्या वाढदिवशी ‘विकासाचा धमाका’; महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रभाग ०९ साठी भव्य विकास आराखड्याची घोषणा

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन
4

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.