मुंबई : मागील दीड महिन्यामध्ये देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीची धामधुम चालू होती. प्रचार, सभा आणि बैठकांचे सत्र सुरु होते. काल सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान अमरावतीत महाविकास आघाडी व राज्यात सुद्धा मविआला कल मिळेल, असा विश्वास काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, अमरावतीत महाविकास आघाडी व राज्यात सुद्धा मविआला कल मिळेल तर अमरावतीत पंजाच निवडून येणार. कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या, निकाल जर आमच्या विरोधात लागला तर सिव्हिल वॉर होईल, असे वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केले आहे. तर सर्व्हे हा मॅनेज असून काहींनी घाबरून कल दिला, असा दावाही ठाकूर यांनी दिला आहे.