Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजुरा मतदारसंघातील मतचोरीप्रकरणी एका महिन्यात कारवाई करा, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा

मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून, या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा अतुल लोंढे यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 09, 2025 | 04:59 PM
राजुरा मतदारसंघातील मतचोरीप्रकरणी एका महिन्यात कारवाई करा, अन्यथा...; काँग्रेसचा इशारा

राजुरा मतदारसंघातील मतचोरीप्रकरणी एका महिन्यात कारवाई करा, अन्यथा...; काँग्रेसचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. एका-एका मतदारसंघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे, असा दावा काँग्रेस पक्षाने केला आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा मुद्दा गेल्या काही दिवसाखाली उघडकीस आणला होता. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून, याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे पण ११ महिने झाले तरी अद्याप यावर कोणतीच कारवाई होत नाही. या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मतचोरीची माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या ५ महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदारसंघात ५५ हजार मतदारांची वाढ करण्यात आली. राजुरा मतदारसंघात १ ऑक्टोबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ११ हजार ६६७ ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर ६८५३ मते डिलिट करण्यात आली. याप्रकरणी एफआयआर ही दाखल करण्यात आला आहे. पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही. ही ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे IP address, email id आणि मोबाईल नंबर ची माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे पण आजपर्यंत ती देण्यात आलेली नाही. ही माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देत नाही.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राजुरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराकडे ६१ लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले. निवडणूक आयोगाच्या FST पथकाने ही कारवाई केली आहे, गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पण आजपर्यंत यावरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई संदर्भात काहीच हालचाल केली जात नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेच पण न्यायालयातही लढा देऊ, असे अतुल लोंढे म्हणाले. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष धोटे यांनीही यावेळी मतचोरीप्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

Web Title: Congress party has criticized the election commission and bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • Atul Londhe Congress
  • Congress
  • Election Commission
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

महाविकास आघाडीची भाकरी भाजणार की करपणार! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात
1

महाविकास आघाडीची भाकरी भाजणार की करपणार! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नाहीतर आम्ही…; काँग्रेसचा इशारा
2

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नाहीतर आम्ही…; काँग्रेसचा इशारा

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार
3

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार

Congress Politics : कॉंग्रेसमध्ये विचारधारेचे द्वंद्व! सुरुवातीपासूनच राहिला असंतोष अन् भांडण
4

Congress Politics : कॉंग्रेसमध्ये विचारधारेचे द्वंद्व! सुरुवातीपासूनच राहिला असंतोष अन् भांडण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.