Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे, मुंबईतील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा अन्…; हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा आणि येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर एक संपूर्ण दिवसभर चर्चा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 08, 2025 | 04:54 PM
पुणे, मुंबईतील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा अन्...; हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

पुणे, मुंबईतील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा अन्...; हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे अन् मुंबईतील जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा
  • हिवाळी अधिवेशनात एक दिवस चर्चा करा
  • काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळांची मागणी
मुंबई : भाजपा महायुतीचे सरकार गेंड्याचे कातडीचे असून, या सरकारचा कारभार पाहता त्यांनी बेशरमपणाचा कळस गाठला आहे. दररोज एक मोठे प्रकरण उघड होत असून, कारवाई मात्र शून्य आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी राज्य लुटण्याचा सपाटा लावला आहे. मुंबई, पुणेसह राज्यात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात आहेत. या सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा आणि येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर एक संपूर्ण दिवसभर चर्चा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी पुण्यातील ४० एकर महार वतनाची जमीन ३०० कोटी रुपयांना खरेदी केली, त्यासाठी केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क रुपये भरले, त्या जागेवर आयटी पार्क उभारण्याचा प्रस्तावही तातडीने मान्य करण्यात आला, दस्तावेजामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आले. हा भ्रष्ट कारभार उघड झाल्यानंतर आता जमीन खरेदी व्यवहार रद्द केला असे सांगितले जात आहे, म्हणजे चोरी केल्याची कबुली देत आहेत, मग कारवाई का करत नाहीत? एफआयआर मध्ये पार्थ पवारांचे नाव का नाही? पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने याआधी पुण्याच्या बोपोडीतील ॲग्रीकल्चर डेअरीची सरकारी जमिन बोगस कागदपत्रे तयार करून हडपली. या सर्व व्यवहारासाठी पैसे कुठून आले तर ते एका साखर कारखान्यातून आले. हे पैसे कोणी दिले? कसे दिले? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. चौकशी समिती नेमून सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे.

भाजपाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात जैन बोर्डिंगची जमीन लाटली होती, तो प्रकार उघड होताच व्यवहार रद्द करण्यात आला हे जाहीर करण्यात आले पण हे प्रकरण संपलेले नाही. या प्रकरणातील धर्मादाय आयुक्त हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर काय करवाई झाली? मुंबईत अदानीला शेकडो एकर जमीन फुकटात दिली. भाजपाच्या मुंबईतील कार्यालयासाठी सरकारी जमिनीचा केलेला व्यवहार, देवेंद्र फडणवीस यांनी उभा केलेला नवा शेठ मोहित कंभोजला एसआरएच्या जमिनी दिल्या आहेत. पुण्यात रिंगरोडच्या जमीन अधिग्रहणात मोठा घोटाळा करण्यात आला. समृद्धी महामार्गात कोणाची समृद्धी झाली हेही जनतेला कळाले पाहिजे, यासाठी सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.

‘वंदे मातरम्’ जातीय/धार्मिक दंगे करण्यासाठी नाही..

राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्ष झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्ष देशभरात विविध कार्यक्रम घेत आहे, पण भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘वंदे मातरम्’ला नेहमीच विरोध केला आहे, संघाच्या शाखेत हे गीत कधीच गायले नाही, ‘वंदे मातरम्’ हे स्वातंत्र्य संग्रामात गायले जात, याला मोठा त्याग व बलिदानाचा इतिहास आहे. भाजपने आता इतक्या वर्षांनंतर ते स्वीकारले याचा आम्हाला आनंदच आहे. पण आता भाजपा या गीताचा वापर राजकीय हेतूने करत आहे. हे पवित्र गीत धार्मिक वा जातीय दंगे घडवण्यासाठी तसेच सामाजिक शांतता भंग करण्यासाठी नाही असे बजावून ‘वंदे मातरम्’ गीतावरचे भाजपाचे प्रेम हे पुतणा मावशीचे आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Congress party has raised questions regarding parth pawars land case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • murlidhar mohol

संबंधित बातम्या

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात
1

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, दारू पिऊन गाडी चालवू नका; नाहीतर…
2

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, दारू पिऊन गाडी चालवू नका; नाहीतर…

भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच; बाबाराजे देशमुखांनी केला प्रवेश
3

भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच; बाबाराजे देशमुखांनी केला प्रवेश

भाजपाच्या विचारात स्त्री-पुरुष समानता नाही, महिलांना दुय्यम स्थान; हर्षवर्धन सपकाळांची टीका
4

भाजपाच्या विचारात स्त्री-पुरुष समानता नाही, महिलांना दुय्यम स्थान; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.