१. राज्यात लवकरच निवडणुका होणार
२. राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्रित येणार?
३. महायुती व महाविकास आघाडीने सुरु केली तयारी
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. मध्यंतरी मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे बंधू यांनी एकत्रित यावे अशी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार का अशी चर्चा सुरु आहे. आगामी निवडणुकीसाठी ठाकरेंची युती होणार का हे पाहावे लागणार आहे. मात्र याबाबत काँग्रेसची भूमिका वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केली आहे.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा सुरु आहे. यामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्यावर भाष्य केले आहे.
काय म्हणाले रमेश चेन्नीथला?
काँग्रेसच्या कार्यशाळेत महाविकास आघाडीबाबत देखील रमेश चेन्नीथला यांनी भाष्य केले आहे. आगामी निवडणुकीत आघाडी होईल किंवा होणार नाही. आम्ही एकत्रितपणे बसून आघाडीबाबत योग्य निर्णय घेऊ. यावेळी रमेश चेन्नीथला यांनी ठाकरे बंधू एकत्रित येण्यावरून आणि त्यांच्यामध्ये अगदी होण्याच्या चर्चांवर भाष्य केले. दोन बंधू एकत्रित येत असल्यास तर आम्हाला काय अडचण नाही. मात्र राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु असल्याचे दिसून येत आहे. लवकरच अमळनेर येथील एक नेता शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होण्याचा अंदाज आहे. या निवडणूक टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे. याआधीच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद वाढताना दिसून येत आहे. लवकरच अमळनेर येथील एक माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिरीष चौधरी हे अमळनेरचे माई आमदार आहेत. ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.