Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांच्या बचावासाठी काँग्रेसचे नौटंकी आंदोलन : केशव उपाध्ये

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या गांधी परिवारासाठी काँग्रेसच्या मुठभर कार्यकर्ते नौटंकी आंदोलन करत जनतेला वेठीस धरत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 17, 2022 | 03:52 PM
भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांच्या बचावासाठी काँग्रेसचे नौटंकी आंदोलन : केशव उपाध्ये
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांना अपुरी मदत, शेतकऱ्यांची वीज तोडणी यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर आंदोलन करण्याऐवजी काँग्रेस कार्यकर्ते गांधी परिवाराच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या गांधी परिवारासाठी काँग्रेसच्या मुठभर कार्यकर्ते नौटंकी आंदोलन करत जनतेला वेठीस धरत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केले. राज्य सरकारने जनतेला वेठीस धरण्याचे प्रयत्न हाणून पाडून जनतेच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, असेही ते म्हणाले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केशव उपाध्ये नेमकं काय म्हणाले?

उपाध्ये म्हणाले की, नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार राहुल गांधी यांच्या विरोधातील ईडी चौकशीत अडथळे आणून चौकशीवर दबाव आणण्यासाठी देशाला वेठीस धरून हिंसक आणि बेकायदा आंदोलन करण्याचा काँग्रेसचा कट असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या मूठभर कार्यकर्त्यांनी राजभवनसह अन्य ठिकाणी निदर्शने केल्याने महाराष्ट्रातही जनतेला वेठीस धरण्याचे प्रयत्न होत आहेत.

असोसिएटेड जर्नल लिमिटेड या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता कवडीमोल किंमतीत हडपल्याच्या प्रकरणी राहुल गांधींची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ‘ईडी’कडून सुरू झालेल्या चौकशी विरोधात सत्याग्रहाचा कांगावा करून देशातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आणण्याचे षड्यंत्र काँग्रेसकडून रचले जात आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात काँग्रेसची निदर्शने सुरू आहेत. काही राज्यांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनाच लक्ष्य केले, तर काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कोंडी करून जनतेलाच वेठीस धरले, असेही उपाध्ये यांनी सांगितले.

[read_also content=”मोशीमध्ये दोन कंपन्यांना भीषण आग, आगीत दोन कंपन्या जळून खाक https://www.navarashtra.com/maharashtra/in-moses-two-companies-were-burned-to-death-nrdm-293640.html”]

पुढे बोलताना उपाध्ये म्हणाले की, पक्षश्रेष्ठींवरील निष्ठा नोंदविण्यासाठी आंदोलनात उतरलेल्या नेत्यांनी आपली विवेकबुद्धी हरवल्याचे सिद्ध केले असून, देशात अराजक माजविण्याच्या कटात सहभागी झाल्याने त्यांनी आपली उरलीसुरली विश्वासार्हता देखील गमावली आहे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याकरिता सुरू असलेल्या या आंदोलनाच्या निमित्ताने सामान्य जनतेला आणि सुरक्षा यंत्रणांना वेठीस धरून दबाव आणण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल व काँग्रेसच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा करून देईल, असा टोलाही उपाध्ये यांनी हाणला.

Web Title: Congresss gimmicky agitation to defend leaders accused of corruption keshav upadhyay nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2022 | 03:52 PM

Topics:  

  • Atul Londhe Congress
  • congress nana patole
  • NAVARASHTRA
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
1

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
2

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक
4

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.