Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंबरनाथमध्ये स्वामी समर्थांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध, लेखक ज्ञानेश महारावांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

नवी मुंबई येथील संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात जेष्ठ लेखक महाराव यांनी प्रभू श्रीराम, स्वामी समर्थ यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. याप्रकरणी अंबरनाथमध्ये श्री स्वामी मठातर्फे निषेध करण्यात आला.

  • By नारायण परब
Updated On: Sep 14, 2024 | 07:39 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Follow Us:

अंबरनाथ पूर्वेच्या श्री स्वामी मठातर्फे जेष्ठ लेखक ज्ञानेश महाराव यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला. नवी मुंबई येथील संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात जेष्ठ लेखक महाराव यांनी प्रभू श्रीराम, स्वामी समर्थ यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. याप्रकरणी राज्यभरात ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. कोल्हापूरात ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शनिवारी अंबरनाथ पूर्वेच्या श्री स्वामी समर्थ चौकात अंबरनाथ मधील स्वामी भक्तांनी काळ्या फिती बांधून ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी स्वामी समर्थ मानवविकास अध्यात्मिक केंद्रातील स्वामी भक्त बांधव, भगिनींनी एकत्र येत ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली.

हे देखील वाचा- आनंद आश्रमात पैशांची उधळण अन् धिंगाणा; ठाकरे गट आणि केदार दिघेंची घणाघाती टीका

स्वामी भक्तांनी दिला इशारा

“या बेताल वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, महाराव यांनी राजकारणाच्या पातळीवर राजकारण करावं मात्र त्यांना आध्यात्म, संप्रदाय यावर बोट उचलण्याचा अधिकार नाही, स्वामी समर्थ महाराज आमचं श्रद्धास्थान आहे त्यांचा अपमानामुळे प्रत्येक स्वामी भक्ताच्या भावना दुखवल्या आहेत त्यामुळे यापुढे जर असं घडलं तर स्वामी भक्त शांत बसणार नाहीत,” असा इशारा स्वामी भक्त दत्तात्रय केंगरे यांनी दिला. यावेळी अस्मिताई म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी भक्त रामचंद्र कदम, हेमंत गायकवाड, दिनेश नलावडे, योगेश हातेकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्वामी समर्थ चौकात स्वामी भक्त निषेध करण्यासाठी उपस्थित होते. तसेच यावेळी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

हे देखील वाचा- कणकवलीतील 2 हजार बाकडी वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप; 2500 ची बाकड्याची किंमत लावली 12500 रुपये

महाराष्ट्रात स्वामी समर्थांना मानणारा मोठा वर्ग 

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भक्तांनी  स्वामीचे मठ उभारले आहेत. त्याठिकाणी भक्तांकडून सेवा करण्यात येते. लेखक ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याने सर्वच स्वामी भक्त दुखावले गेले आहेत. रत्नागिरीमध्येही या अगोदर त्यांचा निषेध करण्यात आला होता.

Web Title: Controversial remarks on swami samarth protested in ambernath demanding strict action against writer dyanesh maharao

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 07:38 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.