Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गरजांवर चर्चा केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अनुषंगाने राबविण्यात येणारे गुणवत्तावर्धक उपक्रम, विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक संधी आणि विद्यापीठातील विविध सुविधांबाबतही संवाद साधण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 15, 2026 | 07:15 PM
मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Follow Us
Follow Us:
  • मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद
  • NEP अंतर्गत गुणवत्तावर्धक उपक्रमांना चालना
  • समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
नीता परब, मुंबई : मुंबई विद्यापीठाने विद्यार्थी केंद्रित दृष्टीकोनातून सुरू केलेल्या ‘विद्यार्थी संवाद’ या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठाच्या विविध वसतिगृहांमध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यापीठाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची, शैक्षणिक संधींची आणि गुणवत्तावर्धक उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी , त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरच्या दृष्टीने उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम, कौशल्याधारित उपक्रम आणि संधी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहांतील विद्यार्थ्यांशी नुकताच संवाद साधला. कर्मवीर भाऊराव पाटील मुलांचे वसतिगृह, जगन्नाथ शंकरशेठ मुलांचे वसतिगृह, मादाम कामा मुलींचे वसतिगृह आणि नवीन मुलींचे वसतिगृह येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

Independence Day 2026: लाल किल्ल्यावर ध्वजारोहणावेळी पंतप्रधानांमागे उभ्या असलेल्या कॅप्टन सोनिया सिंग चौहान कोण आहेत?

मादाम कामा मुलींचे वसतिगृह येथे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यांनी या संवादादरम्यान विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेतल्या. त्याच बरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यापीठाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची आणि शैक्षणिक संधींची माहिती विद्यार्थ्याना दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत वसतिगृहातील शैक्षणिक व निवासी वातावरण अधिक सुरक्षित, सुविधायुक्त आणि विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

कर्मवीर भाऊराव पाटील मुलांचे वसतिगृहास प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जगन्नाथ शंकरशेठ मुलांचे वसतिगृहास क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर नवीन मुलींचे वसतिगृह येथे अधीक्षक डॉ. मधुरा कुलकर्णी आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

विद्यार्थ्यांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्यांचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असून सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे यावेळी विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

How to Learn Coding: कोडिंग शिकण्याची सुरुवात कशी करावी? जाणून घ्या योग्य वय आणि सोपा मार्ग

Web Title: Mumbai university administration direct dialogue with students nep quality enhancement initiatives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • Mumbai University

संबंधित बातम्या

CDOE Admissions : मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस अंतिम मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
1

CDOE Admissions : मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस अंतिम मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
3

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
4

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.