Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: बदलीचे ठिकाण नावडते म्हणून वाद! पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची चालढकल

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मोठ्या प्रमाणात जनरल बदल्या करण्यात आल्या असूनही अनेक अधिकारी व अंमलदारांनी नव्या नेमणुकीच्या ठिकाणी रुजू होण्यास चालढकल केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 11, 2025 | 07:25 PM
Navi Mumbai: बदलीचे ठिकाण नावडते म्हणून वाद! पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची चालढकल
Follow Us
Close
Follow Us:

सावन वैश्य | नवी मुंबई :  नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत मोठ्या प्रमाणात जनरल बदली झाल्या आहेत. मात्र या बदल्या होऊन देखील बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी पोलिस चालढकल करत असताना दिसून येत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीअंतर्गत पोलिस अंमलदार व पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र बदली होऊन सुद्धा पोलीस अंमलदार व अधिकारी अजून पर्यंत बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याचे चित्र दिसत आहे. बदलीचे ठिकाण राहत्या घरापासून दूर असल्याचे काहींनी कारण दिले, तर काहींना पोलीस ठाण्याचे अथवा त्या विभागाचे अधिकारीच सोडत नसल्याची चर्चा सध्या वर्तुळात रंगत आहे. तर काहींना आवडीचे ठिकाण न मिळाल्याने हजर न झाल्याचं समोर येतंय. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या या खांदेपालट ची चर्चा पोलीस वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगत आहे.

Pune News: ‘या’ अन्यायकारक धोरणांविरुद्ध हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी रस्त्यावर; नक्की काय आहे प्रकरण?

बदल हा प्रकृतीचा नियम आहे. याच बदलामुळे निसर्गाचा समतोल राखला जातो. सामाजिक समतोल राखण्यासाठी अनेक वेळा शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. एवढेच नव्हे तर मतदार राजा मतदानाच्या रूपाने मत देऊन सरकार देखील बदलते, जेणेकरून मतदारांच्या समस्या सोडवल्या जाव्यात. नवी मुंबईत शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्ह्यांचा आलेख कमी व्हावा यासाठी आयुक्तालय अंतर्गत मोठ्या प्रमाणात जनरल बदल्या करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना पोलीस ठाणे, वाहतूक कक्ष, अथवा अन्य विभागात 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. तर अंमलदारांना 7 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो.

त्यानंतर आयुक्तालयाच्या आलेल्या आदेशानुसार अंतर्गत बदल्या केल्या जातात. मात्र नवी मुंबई पोलिसांनी बदली करून देखील अनेक अधिकारी व अंमलदारांनी नेमणुकीच्या ठिकाणी न जाण्याचा पसंत केलं आहे. काहींनी नेमणुकीचे ठिकाण घरापासून दूर असल्याचं सांगितलं आहे. तर काहींनी नावडत्या ठिकाणी मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे तेथील अधिकारी सोडत नसल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीस प्रशासन देखील परिसरातील विविध भागांचा आढावा घेऊन, तसेच तेथील गुन्ह्यांची माहिती घेऊन तशा प्रकारच्या अधिकारी व अंमलदारांची बदली करतात.

Navi Mumbai News : नरेश म्हस्के यांची संयुक्त बैठक संपन्न; महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना  

जेणेकरून त्या ठिकाणच्या गुन्हेगारीला आळा बसून शहरात शांतता व सुव्यवस्था राहावी. त्यामुळे नेमणूक झालेल्या ठिकाणी अधिकारी व अंमलदार रुजू होतात का? किंवा आवडत्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी वशिला लावतात, हे काही दिवसात दिसेल.

Web Title: Controversy over transfers of officers in navi mumbai police commissionerate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 07:25 PM

Topics:  

  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai : गणपती विसर्जनासाठी नवी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त; ठिकठिकाणी करडी सुरक्षा
1

Navi Mumbai : गणपती विसर्जनासाठी नवी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त; ठिकठिकाणी करडी सुरक्षा

Navi Mumbai : पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला अडीच लाखांची फसवणूक; पोलीसांचा तपास सुरु
2

Navi Mumbai : पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला अडीच लाखांची फसवणूक; पोलीसांचा तपास सुरु

Navi Mumbai Crime : अरे चाललंय तरी काय! जामिनावर सुटलेल्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला
3

Navi Mumbai Crime : अरे चाललंय तरी काय! जामिनावर सुटलेल्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला

नवी मुंबईत पोलीस उपायुक्त 2 च्या कार्यालयाचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
4

नवी मुंबईत पोलीस उपायुक्त 2 च्या कार्यालयाचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.