Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगरात कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवसात आढळले 8 रुग्ण, मास्क वापरण्याचे प्रशासनाकडून आवाहन

मागील वर्षात जिल्ह्यासह शहरातूनही कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला होता. मात्र, त्यांचा संसर्ग पुन्हा वाढत असून, गेल्या आठवड्यात शहरात कोरोना रुग्ण आढळला. त्यात चार रुग्ण आढळले होते. गुरुवारच्या अहवालात तब्बल आठ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आरोग्य विभागासह मनपाचे धाबे दणाणले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 29, 2023 | 02:46 PM
संभाजीनगरात कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवसात आढळले 8 रुग्ण, मास्क वापरण्याचे प्रशासनाकडून आवाहन
Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : मागील वर्षात जिल्ह्यासह शहरातूनही कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला होता. मात्र, त्यांचा संसर्ग पुन्हा वाढत असून, गेल्या आठवड्यात शहरात कोरोना रुग्ण आढळला. त्यात चार रुग्ण आढळले होते. गुरुवारच्या अहवालात तब्बल आठ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आरोग्य विभागासह मनपाचे धाबे दणाणले. व्हायरलमुळे सर्वत्र सर्दी, खोकला, तापेचे रुग्ण आढळत असल्याने यांनीही कोरोना चाचणी करण्याचे आवाहन मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले.

राज्यासह जिल्ह्यात आणि शहरात ही थंडी कधी अधिक थंडी असे वातावरणात बदल होत आहेत. त्यामुळे संसर्गजन्य आजार पसरला असून, घराघरात सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. परिणामी, दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे. त्यातच कोरोना संसर्गाने पुन्हा मनपाकडून कोरोना चाचणी करण्यात येत असून, मागच्या आठवड्यात चाचणीत चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. या चार रुग्णांमध्ये दोन मुली व दोन महिलांचा समावेश आहे.

यातील दोन पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा इतकी झाली आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या चाचण्यामधून आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यात चार पुरुष व चार महिलांचा समावेश आहे.

या भागातील रुग्ण पॉझिटिव्ह

शहरातील आठ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले असून त्यामध्ये न्यायनगर गल्लीनंबर – ७ मधील ४० वर्षीय पुरुष, रँगटीपूरा येथील २२ वर्षीय महिला, कांचनवाडीतील ५४ वर्षीय पुरुष, सिल्कमिल कॉलनी येथील ३१ वर्षीय पुरुष, क्रांतीचौक येथील ५५ वर्षीय पुरुष, हिनानगर चिकलठाणा येथील ३५ वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी एन-२ मधील ५६ वर्षीय महिला, सादातनगर येथील ४२ वर्षीय महिला या रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांचे आरटीपीसीआर स्वॅब तपासणीसाठी घाटी रुग्णालयाच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Web Title: Corona outbreak in sambhajinagar 8 patients found in a single day nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2023 | 02:46 PM

Topics:  

  • coronavirus
  • maharashtra
  • Sambhaji nagar

संबंधित बातम्या

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती
1

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे
2

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे
3

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!
4

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.