वाशीम : गेल्या दोन वर्षांपासून सर्वांची झोप उडविणाऱ्या कोरोना संसर्गजन्य आजाराने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. तर, जिल्ह्यात तब्बल ६४१ रुग्णांचा बळी या संसर्गजन्य आजाराने घेतला आहे. असे असताना गेल्या चार ते सहा महिन्यांपासून कोरोना संसर्गजन्य आजाराचे रुग्ण घटले असताना जिल्हावासियांनी सुटकेचा श्वास सोडला होता. प्रशासनानेही कोरोना निर्बंध हटविले होते. त्यामुळे सर्व सुरळीत सुरू होताच कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असून २९ जून रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ८३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोनाची भीती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या ठिकाणी आढळले कोरोना रुग्ण
वाशीम जिल्ह्यात एकाच दिवशी ८३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मंगरुळपीर शहरात ११, तालुक्यातील पारवा येथे १,जांब येथे १, मंगळसा येथे १,शेलगाव येथे १,अरक येथे १,चिखली येथे २, ईचा येथे १,पिंप्री येथे १,नागी येथे २, लाठी येथे १,जनुना येथे १,कासोळा येथे १, धानोरा येथे १ तर, मालेगाव शहरात २, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथे १, शिवाजी फैल येथे १,दाफणीपुरा येथे १,महागाव येथे १, गवळीपुरा येथे ७,दापुरा येथे १,वाघोळा येथे १, रंगतीपुरा येथे १, राहुल नगर येथे १, शिवनी येथे २,कामरगाव येथे १४,लाडेगाव येथे १,लक्ष्मीनगर येथे १,मोरद येथे १,साळीपुरा येथे १ तोरणाळा येथे १,अनई येथे १,कागजीपुरा येथे १,बिबीसापुरा येथे १,वलई येथे १,गौतमनगर येथे १,मंगळवारा येथे १,कोळी येथे १,धामणीखाडी येथे १,वाढवी येथे १,वडगाव येथे १,शाहा येथे १, उंबर्डा येथे १,बेंबळा येथे १,जानोरी येथे १ रुग्ण आढळून आला आहे. तर जिल्ह्याबाहेरील १ बाधीतांची नोंद झाली आहे.
१५७ रुग्ण ॲक्टिव्ह
गेल्या पंधरा दिवसापूर्वी कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही अत्यल्प होती. तर, त्यानंतर कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढीस लागले असून गेल्या पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीमध्ये कोरोना बाधित ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही तब्बल १५७ वर पोचली आहे.