Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC News: अनधिकृत प्रार्थनास्थळ प्रकरणी महापालिकेला न्यायालयाची ‘कारणे दाखवा’ नोटीस

Pimpri Chinchwad News: सर्वोच्च न्यायालयाच्या अतिक्रमण हटविण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केलेले नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 18, 2025 | 09:13 PM
PCMC News: अनधिकृत प्रार्थनास्थळ प्रकरणी महापालिकेला न्यायालयाची ‘कारणे दाखवा’ नोटीस
Follow Us
Close
Follow Us:
पिंपरी:  पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली व कुदळवाडी परिसरातील काही प्रार्थनास्थळे अनधिकृत असल्याच्या कारणावरून संबंधित बांधकामांवर नोटिसा बजावल्या होत्या. मात्र या नोटिसांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर आकुर्डी येथील न्यायालयाने महापालिका प्रशासनाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. तसेच संबंधित प्रकरणी ३१ जुलै २०२५ पर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.
१६ प्रार्थनास्थळांबाबत आक्षेप
या प्रकरणात अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. श्रीया आवळे, अ‍ॅड. रोहित टिळेकर व अ‍ॅड. अरहंत धोत्रे यांच्या वतीने एकूण १६ प्रार्थनास्थळांबाबत आक्षेप अर्ज दाखल करण्यात आला होता. यामध्ये नोटीसांमध्ये कोणत्या जमिनीवर, कोणत्या ठिकाणी, कोणत्या स्वरूपाचे अतिक्रमण आहे, तसेच त्या बांधकामाचा दर्जा — अनधिकृत, अनियमित की बेकायदेशीर — याबाबत स्पष्टता नाही, असा याचिकेतील आक्षेप आहे.
कलम ३५ चा उल्लेख; कायदेशीर प्रक्रियेवर टीका
याचिकेत म्हटले आहे की, महाराष्ट्र नगर रचना अधिनियमाच्या कलम ३५ नुसार अतिक्रमणविषयक नोटिसा देताना ठोस कारणे व कायदेशीर प्रक्रिया पाळणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता थेट नोटिसा बजावल्या, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अतिक्रमण हटविण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केलेले नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
नागरिकांना संधी नाकारल्याचा आरोप
याचिकेत आणखी असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे की, चिखली आणि कुदळवाडी परिसरातील संबंधित नागरिकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधीच दिली गेली नाही. त्यामुळे नोटिसा बेकायदेशीर ठरतात, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
३१ जुलैपर्यंत उत्तर द्या – न्यायालयाचा आदेश
याचिकेवरील प्राथमिक सुनावणीनंतर आकुर्डी येथील न्यायालयाने महापालिका प्रशासनाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
तसेच, ३१ जुलै २०२५ पर्यंत संबंधित सर्व आक्षेपांना उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहेत.  या प्रकरणी पुढील सुनावणीस महत्त्व असून, महापालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Court issues show cause notice pcmc corporation in unauthorized place of worship case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 09:13 PM

Topics:  

  • Court
  • PCMC News

संबंधित बातम्या

पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह सासूला सुनावली शिक्षा; नेमकं प्रकरण काय?
1

पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह सासूला सुनावली शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.