Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनंजय मुंडेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘या’ प्रकरणी हायकोर्टाने दिला दणका

वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने करुणा शर्मा पोटगीस पात्र असल्याचे मान्य करत त्यांना दरमहा १ लाख २५ हजार रुपये देण्याचे आदेश धनंजय यांना दिले होते. त्यास धनंजय यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 21, 2025 | 07:18 AM
धनंजय मुंडेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; 'या' प्रकरणी हायकोर्टाने दिला दणका

धनंजय मुंडेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; 'या' प्रकरणी हायकोर्टाने दिला दणका

Follow Us
Follow Us:

मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींत आता वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात त्यांना मोठा दणका दिला आहे. पत्नी करुणा शर्मा यांना लागू पोटगीतील ५० टक्के रक्कम ४ आठवड्यांत न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने काढले आहेत. दरम्यान, याप्रकरणी कुटुंब न्यायालयाने दिलेल्या आदेशाला धनंजय मुंडे यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे.

वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने करुणा शर्मा पोटगीस पात्र असल्याचे मान्य करत त्यांना दरमहा १ लाख २५ हजार रुपये देण्याचे आदेश धनंजय यांना दिले होते. त्यास धनंजय यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. दरम्यान, या याचिकेवर ८ आठवड्यांनी अंतिम निर्णय देऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. करूणा यांच्या वतीने वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी युक्तिवाद केला.

21.87 लाख रुपये जमा करावे लागणार

निकालानुसार, ऑगस्ट २०२२ ते जून २०२५ या ३५ महिन्यांच्या काळात एकूण रक्कम ४३ लाख ७५ हजार इतकी होते. यातील २१ लाख ८७ हजार ५०० एवढी ५० टक्के रक्कम वांद्रे न्यायालयात पुढील ४ आठवड्यांत जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने काढले आहेत.

करुणा आणि धनंजय यांचे संबंध लग्नासारखेच

करुणा आणि धनंजय यांचे संबंध लग्नासारखेच असून, दोघांनी २ मुलांना जन्म दिला आहे. एकाच घरात राहिल्याशिवाय हे शक्य नाही. करुणाशी लग्न केले नाही, असा धनंजय यांचा दावा असला तरी त्यांचे संबंध वैवाहिक स्वरुपाचे असल्याचे कोर्टाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र असून, त्यांना व मुलांना मिळून दरमहा २ लाख पोटगी द्यावी. बड्या नेत्याची जीवनशैली पाहता दंडाधिकाऱ्यांनी करुणा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश वांद्रे न्यायालयाने योग्यच ठरवला आहे.

Web Title: Court order to dhananjay munde to deposit 50 percentage of karuna sharma alimony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 07:18 AM

Topics:  

  • dhananjay munde
  • karuna Sharma
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
2

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.