Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Satara News: सातारा-लोणंद रस्त्यावरील जुने पूल कधीही कोसळतील अशी भीती निर्माण झाली आहे. संभाव्य दुर्घटनेत नागरिकांचे बळी जाऊ नयेत, यासाठी मदन साबळे आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासकीय पातळीवर लढा देऊन या मार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश मिळवले.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 07, 2026 | 01:04 PM
Satara News, Lonand Highway, NHAI, Infrastructure, Road Safety

Satara News, Lonand Highway, NHAI, Infrastructure, Road Safety

Follow Us
Follow Us:
  • सातारा-लोणंद मार्गावरील धोकादायक पुलांवरून अवजड वाहतूक बंदीच्या आदेशाची पायमल्ली
  • NHAI आणि जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांमध्ये प्रचंड जनक्षोभ
  • सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व गावांतील नागरिक एकवटले
Satara News: सातारा–लोणंद मार्गावरील जुन्या व अत्यंत धोकादायक पुलावरून होणाऱ्या अवैध अवजड वाहतुकीप्रकरणी आता जनक्षोभ उसळला आहे. पुलांची अवस्था पार बिकट झाली असून, नागरिकांचा संभाव्य जीव वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून सतत पाठपुरावा केला आणि जिल्हा प्रशासनाकडून अवजड वाहतूक बंदीचे कायदेशीर आदेश मंजूर करून घेतले. मात्र, “आदेश कागदावर काढले आणि आमची जबाबदारी संपली,” अशा थाटात जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) स्वतःचे अंग झटकून मोकळे झाले आहे.

या निष्काळजीपणाविरोधात आता सातारा–लोणंद मार्गावरील सर्व गावांतील ग्रामस्थ एकवटले आहेत. “जर प्रशासनाला व NHAI ला सामान्य नागरिकांच्या, प्रवाशांच्या आणि लहान मुलांच्या प्राणाची पर्वा नसेल, तर सर्व गावांना सोबत घेऊन NHAI चे चालू असलेले काम बंद पाडू आणि संपूर्ण महामार्ग रोखून धरू,” असा महा-इशारा भाजप युवा मोर्चाचे सामाजिक कार्यकर्ते मदन भीमाजी साबळे यांनी दिला आहे.

Mira-Bhayandar News: हुल्लड डान्सनंतर आता दारू-मटन पार्टीचा आरोप; पालिका कर्मचारी संजय सोनवणेंना नोटीस

“पाठपुरावा आम्ही करायचा आणि तुम्ही फक्त कागद नाचवणार?”

सातारा-लोणंद रस्त्यावरील जुने पूल कधीही कोसळतील अशी भीती निर्माण झाली आहे. संभाव्य दुर्घटनेत नागरिकांचे बळी जाऊ नयेत, यासाठी मदन साबळे आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासकीय पातळीवर लढा देऊन या मार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश मिळवले.

“आम्ही भांडून, पाठपुरावा करून बंदीचे आदेश आणले. कारण आम्हाला जनतेच्या जिवाची काळजी आहे! मग आता प्रत्यक्ष रस्त्यावर त्याची अंमलबजावणी का होत नाही? केवळ आदेशाचे कागद नाचवून जिल्हा प्रशासन आणि NHAI स्वतःचे अंग का झटकत आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे—तुम्हा अधिकाऱ्यांना जनतेच्या जिवाशी काहीही देणंघेणं उरलेले नाही!” असा जळजळीत सवाल मदन साबळे यांनी उपस्थित केला आहे.

“नागरिकांची काळजी नसेल, तर NHAI चे काम चालणार नाही!”

या मार्गावरील पुलांच्या सुरक्षेकडे व कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या NHAI (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) प्रशासनालाही थेट लक्ष्य करण्यात आले आहे.
“जिल्हा प्रशासनाने बंदीचे आदेश देऊनही NHAI चे अधिकारी डोळे झाकून बसले आहेत. जर NHAI ला नागरिकांच्या सुरक्षेचे काहीच सोयरसुतक नसेल, तर या प्रकल्पाचे काम पुढे चालू देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आधी पुलांची सुरक्षा निश्चित करा आणि अवजड वाहने रोखा, मगच रस्त्याचे काम करा,” असा इशारा देण्यात आला आहे.

पुणे विमानतळाच्या कार्गो वाहतुकीला चांगली पसंती; आठ महिन्यांत तब्बल 44 टक्क्यांची वाढ

सर्व गावांचा ‘एल्गार’ आणि २४ तासांचे अल्टीमेटम:

सगळी गावे उतरणार रस्त्यावर: प्रशासनाने २४ तासांत कारवाई न केल्यास सातारा–लोणंद मार्गावरील प्रत्येक गावातील नागरिक, शेतकरी व तरुण महामार्गावर उतरून तीव्र ‘महा-रस्ता रोको’ आंदोलन करतील.

अंग झटकणे थांबवून कडक गस्त ठेवा: जिल्हा प्रशासन, आरटीओ (RTO), पोलीस आणि NHAI ने तात्काळ २४ तास संयुक्त पथके रस्त्यावर उतरवून प्रत्यक्ष वाहने रोखावीत.

कायदेशीर गुन्हे व वाहने जप्त करा: बंदी आदेश मोडून येणाऱ्या प्रत्येक अवजड वाहनावर तात्काळ गुन्हे दाखल करून वाहने जप्त करावीत आणि दंड आकारावा.

 

Web Title: Satara madan sable warns road blockade on satara lonand highway over heavy vehicle ban

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Infrastructure
  • maharashtra news
  • Maharashtra Politics
  • NHAI
  • Road Safety
  • Satara News

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi:  घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!
2

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा
3

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते
4

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.