Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

व्हायरल व्हिडिओनंतर सुरू झालेल्या वादात शिवराज मोरे यांनी नवनाथ बन यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्याचं म्हटलं होतं. आता नवनाथ बन यांनी मोरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देत थेट 5 हजार कोटींचा दावा करण्याचं आव्हान दिलं आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 07, 2026 | 09:31 PM
Shivraj More navnath ban

Shivraj More navnath ban

Follow Us
Follow Us:
  • शिवराज मोरेंच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर नवनाथ बन यांचं थेट आव्हान.
  • ‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’, बन यांचं वक्तव्य.
  • ड्रग्ज आणि पोलिसांत तक्रारीवरून बन यांनी मोरेंना अनेक सवाल केले.
 

तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं. यानंतर नवनाथ बन यांनी शिवराज मोरे यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली होती.

यावेळी शिवराज मोरेंनी नवनाथ बन यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. आता या सगळ्या वादावर नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली असून, शिवराज मोरे यांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर थेट आव्हान दिलं आहे.

‘मी मुलीबाबत काहीच बोललो नाही’

नवनाथ बन यांनी म्हटलं की, ‘मी शिवराज मोरेंची पोलखोल केली होती. मुलीवर काही बोललो नाही. त्या ताईबाबत कोणताही अपशब्द वापरला नाही.’

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

यानंतर त्यांनी शिवराज मोरे यांना काही थेट प्रश्न उपस्थित केले. “ड्रग्ज सापडले होते तर त्याचं काय केलं? संबंधित प्रकरणात कोणत्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली? शिवराज मोरेंना फोन आला म्हणून ते मदतीला गेले, मात्र तिथे हाणामारी का झाली? त्या तरुणीची छेड काढणाऱ्याविरोधात कोणत्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली? आंदोलन सोडून तिथे जाण्याचं कारण काय?” असे सवाल बन यांनी केले.

‘ड्रग्ज पोलिसांच्या ताब्यात दिले की नाही?’

नवनाथ बन यांनी ड्रग्जच्या मुद्द्यावरूनही प्रश्न उपस्थित केला. ‘ड्रग्ज कोणत्या पोलीस स्टेशनला जमा केले की स्वत:जवळच ठेवले?’ असा सवाल त्यांनी केला.

तसंच, ‘तुम्ही कोणती परीक्षा देत आहात?’ असा सवाल करत त्यांनी संबंधित आंदोलनावरही टीका केली. रोहित पवार यांच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात इतर लोक असल्याचा दावा करत बन यांनी आंदोलनाच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

‘5 हजार कोटींचा दावा करा’; नवनाथ बन यांचं आव्हान

शिवराज मोरे यांनी अब्रुनुकसानीचा दावा करण्याचं वक्तव्य केल्यानंतर नवनाथ बन यांनी त्यांना थेट आव्हान दिलं. ‘कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’ ‘माझं आव्हान आहे, 5 हजार कोटींचा दावा करा. कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू,’ असं नवनाथ बन म्हणाले.

यासोबतच त्यांनी सुरू असलेल्या आंदोलनावरही टीका केली. विनाकारण आंदोलन ताणायचं आणि राहुल गांधींना इथे आणायचं, त्यानंतर प्रदेशाध्यक्षपद मागायचं, असं सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘नवनाथ बन कोणालाही घाबरत नाही. माझ्या साध्या-सरळ प्रश्नांची उत्तरं द्या,’ असंही बन यांनी ठणकावून सांगितलं.

पुणे पोलिसांकडे तपासाची मागणी

ड्रग्ज सापडले असतील आणि ते पोलिसांच्या स्वाधीन केले नसतील, तर हा गंभीर प्रकार असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची मागणी त्यांनी पुणे पोलिसांकडे केली.

आता शिवराज मोरे या आव्हानाला काय उत्तर देतात आणि या प्रकरणात पुढे कायदेशीर कारवाई होते का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Web Title: Navnath ban challenge shivraj more defamation case vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • Student Protest

संबंधित बातम्या

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री
1

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
2

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’
3

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
4

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.