Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Live Breaking News in Marathi: हरमनप्रीत कौरने सर्व प्रकारच्या क्रिकेटच्या कर्णधारपदावरून राजीनामा

७ ऑक्टोबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. दिल्लीत 'इंडिया' आघाडीचे आकाशवाणी भवनात ९ तासांचे ठिय्या आंदोलन, पंतप्रधान मोदींची सार्वजनिक सेवेतील २५ वर्षे पूर्ण, हरमनप्रीत कौरचा राजीनामा आणि राज्यातील हवामान व MPSC अपडेट्स; वाचा सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 07, 2026 | 10:05 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 07.10.2026

Maharashtra Breaking News Today 07.10.2026

Follow Us
Follow Us:
  • 07 Oct 2026 10:05 AM (IST)

    07 Oct 2026 10:05 AM (IST)

    पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

    पुणे शहरातील दुचाकींच्या नोंदणीला सध्या वेग आला असून, नव्याने सुरू करण्यात आलेल्या एमएच-६१ क्रमांक मालिकेतील अवघ्या महिनाभरात दोन सीरीज संपल्या आहेत. एमएच-६१ बी ही पहिली सीरीज नऊ दिवसांत, तर एमएच-६१ सी ही दुसरी सीरीज केवळ १४ दिवसांत संपली. आता एमएच-६१ डी ही तिसरी सीरीजही ४५०० क्रमांकांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे पुण्यात दुचाकी खरेदीचा वाढता वेग स्पष्ट होत आहे.

  • 07 Oct 2026 09:55 AM (IST)

    07 Oct 2026 09:55 AM (IST)

    Pradeep Purnekar Murder case: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात आरोपीच्या गाडीत मिळालेल्या वस्तू पाहून   पोलीस थक्क

    Pradeep Purnekar Murder case:  ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) अतिशय वेगाने सुरू असून या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पूर्णेकर यांची हत्या अचानक झालेली नसून त्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पद्धतशीर कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. या तपासादरम्यान पोलिसांनी हत्येनंतर आरोपींनी पसार होण्यासाठी वापरलेली अल्टो (Alto) कार शोधून काढून ती जप्त केली आहे. मात्र, ही गाडी ताब्यात घेतल्यानंतर त्यातील गोष्टी पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.

     

     

  • 07 Oct 2026 09:45 AM (IST)

    07 Oct 2026 09:45 AM (IST)

    Gujarat Highway Luxury Bus Accident : सावदा घाटात लक्झरी बस उलटून भीषण अपघात; २ ठार, ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी

    Gujarat Highway Luxury Bus Accident: नाशिकवरून गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसला करंजाळी-सावदा घाट परिसरात मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. घाटातील तीव्र वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने लक्झरी बस अनियंत्रित होऊन पलटी झाली. या दुर्दैवी अपघातात बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. महेंद्र पाल आणि राहुल ओझा अशी मृत पावलेल्या प्रवाशांची नावे असून ते दोघेही गुजरातचे रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

  • 07 Oct 2026 09:35 AM (IST)

    07 Oct 2026 09:35 AM (IST)

    Ladki Bahin Yojana Installment Update: लाडक्या बहिणींना दिवाळीला एकत्र मिळणार दोन महिन्यांचे ₹३,००० 

    Ladki Bahin Yojana Installment Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता जमा करण्याबाबत लाभार्थी महिलांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तानंतर किंवा २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत शासन निर्णय (GR) प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या कालावधीत जीआर जारी होण्यास विलंब झाल्यास ऑक्टोबरअखेरपर्यंत हप्ता मिळण्याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • 07 Oct 2026 09:25 AM (IST)

    07 Oct 2026 09:25 AM (IST)

    CM Bhagwant Mann Office CBI Raid: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या  'कॅम्प ऑफिस'सह OSD च्या ठिकाणांवर सीबीआयची धाड 

    CM Bhagwant Mann Office CBI Raid:  पंजाबच्या राजकारणात एकच खळबळ उडवून देणारी घटना घडली असून मुख्यमंत्री भगवंत मान यांचे चंदीगड येथील 'कॅम्प ऑफिस' आणि त्यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) राजबीर घुमन यांच्या विविध ठिकाणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अचानक छापेमारी केली आहे. भ्रष्टाचार, लाचखोरी आणि पदाचा गैरवापर केल्याच्या गंभीर आरोपांवरून सीबीआयने ही मोठी कारवाई केली. या तपासांतर्गत सीबीआयच्या पथकांनी चंदीगड, मोहाली, गुरदासपूर, लुधियाना, पतियाळा, संगरूर आणि जालंधर येथील ठिकाणांची कसून झडती घेत लॅपटॉप, मोबाईल फोन्स, डिजिटल पुरावे आणि अनेक महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे जप्त केली आहेत.

  • 07 Oct 2026 09:15 AM (IST)

    07 Oct 2026 09:15 AM (IST)

    Smriti Mandhana Indian Womens Cricket Captain: हरमनप्रीत कौरच्या राजीनाम्यानंतर स्मृती मानधनाकडे भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद 

    Smriti Mandhana Indian Womens Cricket Captain:  भारतीय महिला क्रिकेट संघात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली असून स्टार फलंदाज स्मृती मानधनाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य कर्णधारपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. गुवाहाटी येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आढावा बैठक पार पडल्यानंतर हा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला. हरमनप्रीत कौरने तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर दीर्घकाळ उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या आणि २०१३ पासून संघाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या २९ वर्षीय स्मृती मानधनाकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे.

  • 07 Oct 2026 09:10 AM (IST)

    07 Oct 2026 09:10 AM (IST)

    Maharashtra Weather: 'ऑक्टोबर हिट'च्या उकाड्यादरम्यान कोकण, विदर्भ अन् घाटात पावसाचा इशारा

    भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) माघारी फिरल्याचे अधिकृतपणे स्पष्ट केले असले, तरी महाराष्ट्रातील वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे पावसाचे सावट कायम आहे. परतीच्या पावसाने अनेक भागात पाठ फिरवल्याने शेती पिकांची स्थिती गंभीर बनली असून, एकाकी तापमान वाढल्याने राज्यभरात 'ऑक्टोबर हिट'चा उकाडा चांगलाच जाणवू लागला आहे. असे असतानाच हवामान विभागाने हवामानात पुन्हा फेरबदल झाल्याचे सांगत पूर्व विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा मोठा इशारा दिला आहे.

Maharashtra to World Breaking News : 

मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार (SIR) विरोधात दिल्लीतील आकाशवाणी भवनात राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांचे ९ तासांचे  ठिय्या आंदोलन, पोलिसांनी प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्व प्रकारच्या क्रिकेटच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला.हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर आणि मध्य भारतात पावसाची पुन्हा शक्यता निर्माण झाली असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत उकाड्यासह अवकाळी पावसाचा इशारा.

पुण्यासह राज्यातील विविध शहरांत MPSC विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळापत्रक आणि उत्तरपत्रिका पारदर्शकतेसाठी आंदोलन तीव्र केले. कोकणात कमी पावसामुळे पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले असून मुंबई-ठाणे भागात ऑक्टोबर हीटचा पारा चढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.  विज्ञानातील अतुलनीय योगदानासाठी भौतिकशास्त्राचा (Physics) २०२६ चा नोबेल पुरस्कार बेल्जियमच्या फ्रान्सिस हाल्झेन यांना जाहीर झाला.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 7 october 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!
1

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा
2

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते
3

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
4

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.