
कोकणातला हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. कोकणातल्या हापूस आंब्याची चवच न्यारी आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हापूस आंबा आवडतो. मार्च महिना सुरु झाल्यानंतर सगळ्यांना हापूस आंब्याची चाहूल लागते. महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातसुद्धा कोकणच्या हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. पण बाजारात मिळणारा आंबा हा नक्की सेंद्रिय हापूस आंबा आहे का? असा प्रश्न अनेकदा सगळ्यांचं पडतो. त्यामुळे आता भारतीय डाक विभागाने एक नवीन सेवा ग्राहकांसाठी सुरु केली आहे. डाक विभागाकडून ग्राहकांना घरपोच आंबे मिळणार आहेत.
ग्राहकांच्या घरी केंदीय हापूस आंबे घरपोच मिळणार आहेत. यंदाच्या वर्षी भारतीय डाक विभागाने उत्पादक आणि ग्राहकांसाठी एक नवीन सेवा चालू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना कोकणातील देवगडचा हापूस आंबा मिळणार आहे. भारतीय डाक विभाग ग्राहकांसाठी अनेक नवनवीन योजना आणि सुविधा राबवत असत. यंदाच्या रक्षाबंधनसाठी देखील भारतीय डाक विभागाकडून एक नवीन योजना राबवण्यात आली आहे. सगळ्यात आधी ग्राहकांना डाक सेवेतून घरपोच आंबे पाठवले जाणार आहेत. यासाठी थेट उत्पादकांशी संपर्क साधून ग्राहकांशी संपर्क जोडला जाणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मालाचा योग्य तो मोबदला मिळणार आहे. ग्राहकांना यामुळे चांगल्या दर्जाची फळे मिळणार आहेत. या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती बाजारपेठ मिळणार आहे. सगळ्यात आधी ही सुविधा सांगली पोस्टतात राबवण्यात आली आहे. यासाठी कार्यालयात नोंदणीसाठी ऑफलाईन व्यवस्था करण्यात आली आहे.
भारतीय डाक विभागाने कोकणातील दहिबाव (ता. देवगड) मधील आंबा उत्पादक शेतकरी श्रीधर ओगले यांच्याशी करार केला आहे. त्यांच्या बागेतील हापूस आंब्याला बाजारात सर्वाधिक मागणी आहे. तसेच त्यांच्या बागेतील आंब्याला जीआय मानांकन मिळाले आहे. आंबा पिकवण्यासाठी त्यांनी कोणत्याही रासायनिक पद्धतीच्या वापर केला नसून त्यांनी नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवला आहे. त्यामुळे ग्राहकांना खात्री मिळणार आहे. श्रीधर ओगले हे मागील १८ वर्षांपासून आंबा व्यवसाय करत आहेत. तसेच ते सिंधुदुर्ग जिल्हा फळ प्रक्रिया उत्पादक संघाचे अध्यक्ष आहेत.