Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: एबी फॉर्म वादाने धाराशिव शिवसेनेत उघडी फूट; पालकमंत्र्यांसमोर तीन तास गोंधळ, महायुतीच्या जागावाटपावर प्रश्नचिन्ह

झेडपी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील जागावाटप व एबी फॉर्म वाटपाच्या मुद्द्यावरून धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत तीव्र असंतोष उफाळून आला आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 26, 2026 | 02:29 PM
एबी फॉर्म वादाने धाराशिव शिवसेनेत उघडी फूट; पालकमंत्र्यांसमोर तीन तास गोंधळ, महायुतीच्या जागावाटपावर प्रश्नचिन्ह (फोटो सौजन्य - Gemini)

एबी फॉर्म वादाने धाराशिव शिवसेनेत उघडी फूट; पालकमंत्र्यांसमोर तीन तास गोंधळ, महायुतीच्या जागावाटपावर प्रश्नचिन्ह (फोटो सौजन्य - Gemini)

Follow Us
Close
Follow Us:
  • एबी फॉर्म वादाने धाराशिव शिवसेनेत उघडी फूट
  • पालकमंत्र्यांसमोर तीन तास गोंधळ
  • महायुतीच्या जागावाटपावर प्रश्नचिन्ह
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सुरू असलेल्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील जागावाटप व एबी फॉर्म वाटपाच्या मुद्द्यावरून धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत तीव्र असंतोष उफाळून आला आहे. काही ठिकाणी शिवसेनेचे एबी फॉर्म भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या हस्ते वाटल्याच्या कथित प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या नाराजीचे रूपांतर थेट पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोर मोठ्या गोंधळात झाले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी आमदार राजन साळवी हे आले असता, तिथे जमलेल्या शेकडो शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. तब्बल तीन तास हा गोंधळ सुरू होता. संतप्त शिवसैनिकांनी एकमेकांना शिवीगाळ केली, काही ठिकाणी अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 निवडणूक प्रचाराची जिल्हाभरात उडाली राळ; जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी

काही जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये शिवसेनेचे अधिकृत एबी फॉर्म भाजप पदाधिकाऱ्यांच्या हाती देण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या मुद्द्यावरून पक्षातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. याच पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख राजन साळवी आणि एका स्थानिक शिवसैनिकामधील तीव्र वादाचा संवाद असलेली ऑडिओ क्लिप रविवारी (२५ जानेवारी) सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये जिल्हास्तरीय नेते आणि संपर्कप्रमुखांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या वादात भूम–परंडा मतदारसंघाचे आमदार व माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांचे नावही घेतले गेले आहे. सावंत यांच्यासारख्या अनुभवी व खंबीर नेत्याच्या हाती पक्षाचे एबी फॉर्म न देता, भाजपाशी जवळीक असलेल्या अजित पिंगळे यांच्यासारख्या नेत्यांच्या हाती फॉर्म देण्यात आल्याने शिवसैनिकांचा संताप अधिकच वाढल्याचे सांगितले जाते. याच असंतोषाचे रूपांतर पालकमंत्र्यांसमोर झालेल्या गोंधळात झाले.

दरम्यान, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. पक्षांतर्गत प्रश्न चुकीच्या पद्धतीने माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर आणणे हे अनुचित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद गटांच्या २३ आणि पंचायत समिती गणांच्या ५० जागा शिवसेना लढवत असून, मुंबईत झालेल्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत हे जागावाटप निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या जागांबाबत वाद आहेत, त्या ठिकाणी चर्चा सुरू असून लवकरच तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत उफाळलेला हा वाद महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यकर्त्यांच्या मनातील असंतोष उघडपणे बाहेर आल्याने याचा निवडणूक रणांगणावर नेमका काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chandrapur News: चंद्रपूर महापौरपदाचा पेच कायम! उबाठा-वंचित गट नोंदणीने वाढली काँग्रेसची डोकेदुखी, भाजपची गणिते जुळणार?

Web Title: Open split in dharashiv shiv sena over ab form controvers three hours of confusion in front of guardian ministers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • shivsena

संबंधित बातम्या

झेंडावंदनावेळी हृदयविकाराने पीएसआय मोहन जाधव यांचे निधन, उमरगा येथे उत्पादन शुल्क विभागातील घटना
1

झेंडावंदनावेळी हृदयविकाराने पीएसआय मोहन जाधव यांचे निधन, उमरगा येथे उत्पादन शुल्क विभागातील घटना

Republic Day 2026 : ‘महाराष्ट्राच्या चित्ररथातून दिसली ‘आत्मनिर्भर’ संस्कृती! गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली
2

Republic Day 2026 : ‘महाराष्ट्राच्या चित्ररथातून दिसली ‘आत्मनिर्भर’ संस्कृती! गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली

ZP School: शालेय विद्यार्थ्यांना फिरते म्युझियमची भेट, तालुक्यातील ३५ जि. प. शांळाना मिळाला लाभ
3

ZP School: शालेय विद्यार्थ्यांना फिरते म्युझियमची भेट, तालुक्यातील ३५ जि. प. शांळाना मिळाला लाभ

अजित पवारांना मोठा धक्का! बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर; मुंबईत होणार पक्षप्रवेश
4

अजित पवारांना मोठा धक्का! बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर; मुंबईत होणार पक्षप्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.