
शालेय विद्यार्थ्यांना फिरते म्युझियमची भेट, तालुक्यातील ३५ जि. प. शांळाना मिळाला लाभ (फोटो सौजन्य - Gemini)
त्यामुळे विद्यार्थ्यांना या संस्कृतीची माहिती व ज्ञान मिळण्याच्या उद्देशा असल्याने याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अलर्ट सिटीजन फोरम चे अध्यक्ष नीरजन आहेर यानी दिली हा उपक्रम सहा दिवस विक्रमगड तालुक्यातील विविध शाळेमध्ये दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्याथ्यर्थ्यांना या संस्कृतीची व पूर्वी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची माहिती मिळाली आहे.
तसेच येणाऱ्या दिवसात या भागातील विद्यार्थ्यांना आकाशगंगा सूर्यमाला ग्रह तारे यांचे होणारे परस्पर संबंध त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठीही खास शो करणार नियोजन असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले या कार्यक्रमास विस्तार अधिकारी पाचमासे सर, कासले सर, किरण रोहे सर, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयातील पदाधिकारी अलर्ट सिटीजन फोरम चे पदाधिकारी आदी जन उपस्थित होते.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन वस्तुसंग्रहालय पाहणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन म्युझियम बसच्या माध्यमातून हजारो वर्षांपूर्वीच्या सिंधू-हडप्पा संस्कृतीचा इतिहास, त्यातील अवशेष, संशोधन व विविध ऐतिहासिक माहिती विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आली. बसमध्ये उभारण्यात आलेल्या प्रदर्शनाची विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने पाहणी केली.