
dancer Gautami Patil Car Accident News Update Protest by ganimi Kava sanghatana
पुण्यातील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षा चालक सामाजी मरगळे आणि बसलेले प्रवासी जखमी झाले. रिक्षा चालकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अपघातानंतर तिच्या ड्रायव्हरने पळ काढल्यामुळे गौतमीवर टीकेची झोड उठवली. या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन केला आणि गौतमी पाटीलला उचलायचं की नाही अशी विचारणा केली आहे. त्याबाबतच चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना देखील केल्या होत्या. याबाबत आता पुणेकरांनी गौतमी पाटील विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यामध्ये बालगंधर्व चौकात गौतमी पाटीलच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. गनिमी कावा संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराबाहेर नृत्यांगणा गौतमी पाटील विरोधात आंदोलन करण्यात आले. गनिमी कावा संघटनेतर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच गौतमी पाटीलच्या फोटोला जोडे देखील मारले. अपघात प्रकरणी तिने रिक्षा चालकांना मदत न केल्यामुळे रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे यांनी गौतमीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ” गौतमी एक कलाकार आहे. नैतिक जबाबदारी घेऊन तिने जखमी झालेल्या रिक्षा चालकाला मदत करावी. गौतमी पाटील म्हणजे चालता बोलता डान्सबार आहे अशा शब्दांतही त्यांनी टीका केली. ” गौतमी पाटील त्या जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबाला मदत करणार नसेल, तर आम्ही राज्यभरात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही” असा इशारहाही संजय वाघमारे यांनी दिला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गौतमी पाटील विरोधी झालेल्या या आंदोलनाला रिक्षाचालक सामाजी मरगळे यांची मुलगी देखील उपस्थित होती. आम्हाला न्याय हवा अशी मागणी तिने केली. पोलिसांनी जरी गौतमी पाटीलला क्लीनचीट दिली असली तरी आम्ही हायकोर्टात जाणार आहोत पोलीस कायदेशीर कारवाई करणार नाहीत. कारचा अपघात झाल्यानंतर गौतमी पाटील हिने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. खरंतर संपर्क साधणं, मदतीचा हात पुढे करणं ही गौतमी पाटीलची नैतिक जबाबदारी होती, मात्र तिने ती पाळली नाही अशा शब्दांत रिक्षा चालकांच्या मुलीने नाराजी व्यक्त केली.