Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पुणेकरांचा नाद नाही! लाडक्या बहिणींच्या पैशांचा उल्लेख करत मागितले मत; थेट केली आमदारांविरोधात तक्रार

पुण्यात प्रचाराच्या मेसेजमध्ये लाडक्या बहीण योजनेच्या पैशांचा उल्लेख केल्यामुळे मतदाराने निवडणूक आयोगामध्ये आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 11, 2026 | 01:28 PM
Punekar file complaint against Yogesh Tilekar for mentioning the 'Ladki Bahin Yojana funds during election campaign

Punekar file complaint against Yogesh Tilekar for mentioning the 'Ladki Bahin Yojana funds during election campaign

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रचारामध्ये लाडकी बहीण योजनेचा उल्लेख
  • पैशांचा उल्लेख केल्याने पुणेकर मतदार आक्रमक
  • आमदार योगेश टिळकरांविरोधात तक्रार
Complaint against Yogesh Tilekar : पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Maharashtra Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. अनेक वर्षानंतर रखडलेल्या निवडणूका होत असल्यामुळे राजकारणाला उधाण आले आहे. प्रचाराचा धुराळा उडाला असून जोरदार राजकीय टीका केली जात आहे. त्याचबरोबर उमेदवारांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. मात्र एका पुणेकराने (Pune News) थेट विद्यमान आमदारांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रचारामध्ये लाडक्या बहिणींच्या पैशांचा उल्लेख केल्याने ही तक्रार करण्यात आली आहे.

पुण्यातील प्रभाग क्रमांक 40 मधील यश गजमल या रहिवाशाने सदर तक्रार दाखल केली आहे. हा मतदार याच भागातील रहिवासी असून त्यांनी प्रचारामध्ये येणाऱ्या मेसेजवरुन तक्रार दाखल केली. प्रचाराच्या मेसेजमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे हे 14 तारखेला येणार असल्याचे म्हटले आहेत. तसेच महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. याचा उल्लेख मेसेजमध्ये करत मते मागितल्यामुळे यश गजमल यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

हे देखील वाचा : “…म्हणून अजितदादांनी आंदेकरांच्या घरात पुन्हा दिली उमेदवारी; आंदेकरांच्या मुलींनी मांडल्या भावना

काय आहे मतदाराची तक्रार?
प्रभाग क्र. ४० मध्ये विद्यमान आमदाराद्वारे रोख रक्कम हस्तांतरणाद्वारे मतदारांना प्रलोभन दिल्याबद्दल तक्रार दाखल करत असल्याचे तक्रारदार मतदाराने स्पष्टपणे लिहिले आहे. पत्रामध्ये लिहिले आहे की, “मी पुणे, प्रभाग क्र. ४० येथील रहिवासी आहे. विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांनी आदर्श आचारसंहितेचे आणि निवडणूक कायद्यांचे गंभीर उल्लंघन केल्याची बाब मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी, माझ्या आईला योगेश टिळेकर यांच्याकडून एक एसएमएस संदेश प्राप्त झाला, ज्यामध्ये असे नमूद केले होते की, लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये ₹३,००० ची रक्कम थेट जमा केली जाईल आणि मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या संदेशात स्पष्टपणे नमूद केले होते की, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या एक दिवस आधी हे रोख हस्तांतरण केले जाईल,” असे तक्रारदाराने नमूद केले आहे.

 

लाडकी बहीण योजनेच्या पैशांचा प्रचारासाठी उल्लेख केल्याने पुणेकरांची योगेश टिळेकर विरोधात तक्रार दाखल केली (फोटो – सोशल मीडिया)

त्याचबरोबर पुढे लिहिले आहे की, “हा संदेश थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) नावाखाली आर्थिक प्रलोभन देऊन मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दर्शवतो. अशा कृती लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ अंतर्गत लाचखोरी आणि भ्रष्ट आचरण मानल्या जातात आणि निवडणुकीदरम्यान लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे थेट उल्लंघन आहे. राजकीय फायद्यासाठी मतदारांच्या वर्तणुकीत फेरफार करण्यासाठी सार्वजनिक निधी आणि कल्याणकारी योजनांचा वापर करणे हे लोकशाही प्रक्रियेची अखंडता आणि निष्पक्षता गंभीरपणे धोक्यात आणते. ही प्रथा एक धोकादायक पायंडा पाडते आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुकांवरील जनतेचा विश्वास कमी करते,” असे देखील पुणेकर मतदाराने लिहिले आहे.

हे देखील वाचा : अमोल बालवडकरांचे तिकीट का कापले? चंद्रकांत पाटील यांनी केला खुलासा

मतदार गजमल यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की, “या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधित आमदार आणि पक्षावर कठोर कारवाई करावी, निवडणुकीच्या हेतूने असे कोणतेही हस्तांतरण होणार नाही याची खात्री करावी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी तक्रारदार मतदाराने केली आहे. माझ्या तक्रारीच्या समर्थनार्थ आवश्यक असलेले स्क्रीनशॉट आणि इतर कोणतेही अतिरिक्त पुरावे सादर करण्यास मी तयार आहे. या गंभीर विषयाकडे त्वरित लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद,” असे देखील मतदार यश गजमल म्हणाले आहेत.

Web Title: Punekar file complaint against yogesh tilekar for mentioning the ladki bahin yojana funds during election campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • PMC Election 2026
  • pune news

संबंधित बातम्या

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न
1

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न

Mumbai Political News: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
2

Mumbai Political News: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

आमच्या दादा , भाऊला निवडून द्या! लहान मुलांचा निवडणुकीसाठी सर्रास वापर
3

आमच्या दादा , भाऊला निवडून द्या! लहान मुलांचा निवडणुकीसाठी सर्रास वापर

Pune Election : प्रभाग 9 साठी राष्ट्रवादीचा प्रगती अहवाल अन् ‘जनहितनामा’ प्रसिद्ध
4

Pune Election : प्रभाग 9 साठी राष्ट्रवादीचा प्रगती अहवाल अन् ‘जनहितनामा’ प्रसिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.