Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईच्या प्रचारासाठी मुलगी रेवती सुळे मैदानात; बारामती शहरात पदयात्रेसह मतदारांच्या भेटीगाठी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कन्या रेवती सुळे यादेखील मैदानात उतरल्या असून, त्यांनी युगेंद्र पवार यांच्या समवेत बारामती शहरातून कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 25, 2024 | 08:14 PM
आईच्या प्रचारासाठी मुलगी रेवती सुळे मैदानात; बारामती शहरात पदयात्रेसह मतदारांच्या भेटीगाठी
Follow Us
Close
Follow Us:

बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कन्या रेवती सुळे यादेखील मैदानात उतरल्या असून, त्यांनी युगेंद्र पवार यांच्या समवेत बारामती शहरातून कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या.

बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी दिग्गज पदाधिकारी जोरदारपणे प्रचार करत आहेत. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे स्वतः आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कुटुंबातील अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार हे पत्नी शर्मिला पवार व पुत्र युगेंद्र पवार हे मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. गुरुवारी (दि २५) सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे प्रथमच निवडणूक प्रचारामध्ये उतरल्या आहेत.

युगेंद्र पवार यांच्या समवेत त्यांनी बारामती शहरातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत पदयात्रा काढली. यावेळी अनेक मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी देखील घेतल्या. यावेळी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. दरम्यान रेवती सुळे यांच्याशी प्रसिद्ध माध्यम आणि संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले. यावेळी युगेंद्र पवार म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांना चांगले मताधिक्य मिळणार आहे.

जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना मिळत आहे. या पदयात्रेमध्ये प्रचार प्रमुख सदाशिव सातव, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख ॲड. राजेंद्र काळे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील शिंदे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सत्यव्रत काळे, महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्ष वनिता बनकर, काँग्रेसचे वीरधवल गाडे, समीर ढोले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Daughter revathi sule in field for mothers campaign for baramati lok sabha election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2024 | 08:13 PM

Topics:  

  • Baramati Lok Sabha
  • maharashtra
  • political news

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
3

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
4

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.