Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : मुक व्हिडीओतून शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’; नांदेडच्या राजकारणात जोरदार रंगली चर्चा

नगरसेविका मीनल पाटील यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या प्रवेशावेळी घडलेल्या 'आवाज नसलेल्या' व्हिडिओनेच राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 02, 2026 | 03:45 PM
DCA Eknath Shinde and Corporator Meenal Patil Nanded Viral Video political news

DCA Eknath Shinde and Corporator Meenal Patil Nanded Viral Video political news

Follow Us
Close
Follow Us:

Nanded News : नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या एक ‘मूक व्हिडिओ’ प्रचंड गाजत असून, त्यातून उलगडणाऱ्या राजकीय संकेतांनी सत्ताधाऱ्यांच्या गोटात खळबळ उडवली आहे. शिवसेनेची उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक ३ मधून विजय मिळवणाऱ्या नगरसेविका मीनल पाटील यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या प्रवेशावेळी घडलेल्या ‘आवाज नसलेल्या’ व्हिडिओनेच राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे. या प्रवेशाच्या वेळी नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार उपस्थित असल्याचे समजते.

 

या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे, आमदार बालाजी कल्याणकर, गजानन पाटील आणि नगरसेविका मीनल पाटील यांच्यात झालेला संवाद दिसत आहे. पण आवाज नसल्यामुळे नेमका ‘कानमंत्र’ काय दिला, यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्काना उधाण आले आहे. मात्र, विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, “नकारात्मकता बाजूला ठेवा आणि पक्षासाठी एकदिलाने काम करा,” असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा

नांदेड उत्तरमध्ये राजकीय हालचालींना वेग

विशेष म्हणजे, मनपा निवडणुकीत आमदार कल्याणकर यांनी गजानन पाटील यांना उघड विरोध केला होता. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः गजानन पाटील यांच्या भेटीला गेले आणि त्याच ठिकाणी आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती लागली. यामुळे या भेटीला अधिकच राजकीय वजन प्राप्त झाले आहे. त्या क्षणी चारही नेत्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, देहबोली आणि एकमेकांकडे पाहण्याची शैली यावरून अनेक अर्थ काढले जात आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे युवा नेते गजानन पाटील यांनी या भेटीबाबत फारसे उघडपणे बोलणे टाळले असले, तरी “काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या.” एवढाच ओझरता उल्लेख त्यांनी केला आहे. यामुळे या भेटीभोवतीचे गूढ अधिकच गडद झाले आहे, मीनल पाटील यांनी नगरसेविका म्हणून राजकारणात दमदार एन्ट्री केली असली, तरी त्यांचे लक्ष्य केवळ मनपापर्यंत मर्यादित नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांची उद्दिष्ट विधानसभा आहे ते नांदेड उत्तरच्या मतदारांना हळूहळू कळायला सुरुवात झाली आहे. ‘मिशन २०२९ उत्तर विधानसभा मतदार संघ डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सुरू केलेली राजकीय भ्रमंती सध्या नांदेड उत्तर मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे. एका ‘मूक व्हिडिओ’ने नांदेडच्या राजकारणात मोठा आवाज निर्माण केला आहे.

हे देखील वाचा : तो आक्षेपार्ह व्हिडिओ अन् पक्षाची झाली थू-थू; सुनेत्रा पवारांचा थेट झिरवळांना फोन

शहर वाहतूक शाखा वजिराबादची कारवाई

नांदेड शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी शहर वाहतूक शाखा वजिराबादने अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना/परमिट वाहने, अनधिकृत फळगाडे व हातगाड्यांवर धडक कारवाई करत एकूण २०१ केसेस दाखल केल्या असून २ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार शहरात वाढत असलेल्या ट्राफिक समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत
विना परवाना चालणारी वाहने, अवैध प्रवासी वाहतूक, भरधाव वेग, फटाका बुलेट, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, तसेच रस्त्यावर अनधिकृतपणे उभे केलेले फळगाडे व हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. ३१ मार्च रोजी सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व त्यांच्या पथकाने रेल्वे स्टेशन रोड, महावीर चौक, कलामंदिर परिसर, वर्कशॉप, राज कॉर्नर व छत्रपती चौक येथे विशेष तपासणी मोहीम राबवली. ऑटोचालकांना गणवेश परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने, ट्रिपल सीट प्रवास, परवाना नसलेली वाहने व रस्त्यावरचे अतिक्रमण यावर कठोर कारवाई करण्यात आली.

Web Title: Dca eknath shinde and corporator meenal patil nanded viral video political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Nanded
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात
1

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका
2

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत
3

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.