Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण; अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

डिपॉझिट म्हणून १० लाख रुपये भरा असे सांगितले. तरच प्रक्रिया सुरू करू म्हणून उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. त्यांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. नंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालयाला संपर्क करण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2025 | 03:07 PM
Pune News: मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण; अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) यांच्या पत्नीबाबत ही प्रकार घडला असून, उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाने प्रथम दहा लाख रुपये जमा करा, तरच दाखलकरून उपचार सुरू केले जातील अशी भूमिका घेतली. त्यामुळे महिला पिंपरी-चिंचवड शहरातील एका रुग्णालयात जाऊन दाखल झाली. त्याठिकाणी महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर आता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे  एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.  यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, “पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं श्रीमती तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनानं घेतली आहे. आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीनं, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं श्रीमती तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनानं घेतली आहे. आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः… — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 4, 2025

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “रूग्णालय प्रशासनानं त्यांचं म्हणणं मांडलं असलं तरी, संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनानं समजून घेतल्या असून चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं, ही विनंती.”

भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू

सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी मोनाली या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.  दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांना क्रिटीकल परिस्थिती असून, डिपॉझिट म्हणून १० लाख रुपये भरा असे सांगितले. तरच पुढील प्रक्रिया सुरू करू म्हणून उपचारासाठी दाखलकरून घेतले नाही. त्यांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. नंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला संपर्क देखील करण्यात आला.

Pune News: मंगेशकर रुग्णालयाच्या बेफिकरीमुळे गर्भवतीचा मृत्यू; बावनकुळे म्हणाले, “… ही तर मुघलशाही”

मात्र, तरीही रुग्णालय प्रशासनाने याबाबत काहीही पावले उचलली नाही. सकाळी ९ वाजता आलेली महिला दुपारी दोनपर्यंत त्याच ठिकाणी होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. नंतर महिला अतिरक्तस्त्राव होत असल्याने वाकड येथील एका रुग्णालयात दाखल झाली. त्याठिकाणी उपचार सुरू झाल्यानंतर महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या. परंतु, मोनाली यांचा मृत्यू झाला.

Web Title: Dcm ajit pawar order mangeshkar hospital enquiry to collector of pune pregnant women death news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • ajit pawar
  • crime news
  • Dinanath Mangeshkar Hospital
  • Pune

संबंधित बातम्या

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्…; सासवडमधील धक्कादायक प्रकार
1

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्…; सासवडमधील धक्कादायक प्रकार

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप
2

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार
3

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत
4

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.