बीड: बीड जिल्हा सध्या सर्वांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील अनेक घटना समोर येत आहे. दरम्यान पालकमंत्रीपदाचे वाटप झाले तेव्हा बीड जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारले आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. अजित पवार सकाळीच बीड पोलिस मुख्यालयात दाखल झाले. या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जनतेने जातीचे खूळ आपल्या डोक्यातून काढले पाहिजे असे आवाहन केले. मागे झालेल्या चुका आता जास्तीत जास्त टाळल्या पाहिजेत. नवीन पिढीसाठी काहीतरी केले पाहिजे. तुम्ही थोडासा धीर धरा. मी काय करतो ते पहा. या जिल्ह्यात अनेक गोष्टी करण्याच्या माझा प्रयत्न असणार आहे. मी इथले राजकारण अनेक वर्षे पाहत आहे.
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित युवा संवाद मेळाव्यात युवा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती ठोस पावलं तत्काळ उचलली जातील. जिल्हा स्तरावर जी कामं प्रलंबित आहेत, जी प्रगतीपथावर आहेत आणि जी कामं आगामी काळात… pic.twitter.com/hRxMfTyTm7
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 2, 2025
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, इतक्या वर्षांमध्ये बीड जिल्ह्याला अनेक मंत्रीपदे आणि अन्य पदे मिळाली. मात्र इतक्या वर्षांत नक्की काय विकास झाला हे पहावे लागणार आहे. मी महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो आहे.’
अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या 9 ते 10 दिवसांपासून शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. सर्व शिक्षक उपोषण करत आहेत. दरम्यान आज अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान शिक्षक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अजित पवारांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि निवेदन स्वीकारले.
बीडच्या पहिल्याच दौऱ्यात अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना दम
बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. तसेच कोट्यवधींचे घोटाळे देखील समोर येत आहे. भाजप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया हे रोज नवीन प्रकरणं समोर आणत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देण्यात आलेले नाही. अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रिपद घेतले असून ते बीड दौऱ्यावर गेले आहेत. पालकमंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत गुन्हेगारी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
“…जर कोणी खंडणी मागितली तर”; बीडच्या पहिल्याच दौऱ्यात अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना दम
अजित पवार यांनी सकाळी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर बोलताना अजित पवार यांनी खंडणी मागणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर रिवॉल्व्हर घेऊन फिरणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यार असल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, “बीड सध्या सातत्याने चर्चेत आहे. अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये. जिथे काही तथ्य असेल तिथे कारवाई करणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.