शरद पवार पुण्यात येण्यापूर्वीच जयंत पाटील-अजित पवारांमध्ये भेट (Photo Credit- Social Media)
बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. त्याचे व मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध असल्यामुळे मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आहे. यावेळी बीडमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे.
बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. तसेच कोट्यवधींचे घोटाळे देखील समोर येत आहे. भाजप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया हे रोज नवीन प्रकरणं समोर आणत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देण्यात आलेले नाही. अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रिपद घेतले असून ते बीड दौऱ्यावर गेले आहेत. पालकमंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत गुन्हेगारी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवार यांनी आज सकाळी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर बोलताना अजित पवार यांनी खंडणी मागणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर रिवॉल्व्हर घेऊन फिरणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यार असल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, “बीड सध्या सातत्याने चर्चेत आहे. अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये. जिथे काही तथ्य असेल तिथे कारवाई करणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, त्याचबरोबर विकास कामे करत असताना कोणी कोणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नये. जर असले प्रकार माझ्या कानावर आले तर मी मकोका लावायलाही मागे पुढे पाहणार नाही. यासाठी मी टोकाची भूमिका घेणार आहे. मी इथले अधिकारीही पाहणार आहे, इथे काही अधिकारी बऱ्याच वर्षांपासून आहेत, त्यामध्येही मी लक्ष घालणार आहे. असे करत असताना मी कोणताही भेदभाव करणार नाही, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये बीडमधील रिवॉल्व्हरने हवेत गोळीबार करणारे आणि कंबरेला रिवॉल्व्हर लावून फिरणाऱ्यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरही अजित पवार यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, “आपण पाहतो टीव्हीवर कधी कधी दाखवले जाते की, कोणी रिवॉल्व्हरने हवेत गोळीबार करते, कोणी कंबरेला रिवॉल्व्हर लावून फिरते. मी पोलीस प्रशासनाला सांगणार आहे, जो कोणी असले प्रकार करेल, त्याचा रिवॉल्व्हर परवाना रद्द करावा. रिवॉल्व्हर हे तुमच्या संरक्षणासाठी आहे. त्यामुळे तुम्ही जे रील वगैरे बनवाता ते मी खपवून घेणार नाही.” अशा कडक शब्दांत अजित पवारांनी इशारा दिला आहे.