Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Sassoon Hospital : ‘ससून’ची सुधारणा अन् सुरक्षेसाठी मोठा निर्णय! रुग्णालयात आता पोलीस चौकी

Police station at Sasoon Hospital : ससून रुग्णालयाच्या सुरक्षेच्या बाबत अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे. यानंतर आता रुग्णालयाच्या आवारात पोलीस स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आसा आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 09, 2025 | 01:19 PM
Decision to set up a police post for security at Sassoon Hospital in Pune

Decision to set up a police post for security at Sassoon Hospital in Pune

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता सर्वच रुग्णालयाला खडबडून जाग आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख व सर्वात मोठ्या ससून रुग्णालय आता आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यामध्ये सध्या रुग्णालयाच्या आवारामध्ये असणाऱ्या सुरक्षेच्या त्रुटी सुधारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. याचसाठी आता ससून रुग्णालयातील आवारामध्ये पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे.

ससून रुग्णालयाच्या आवारात ‘पोलीस चौकी’ तसेच तपासणीसाठी पिडीतांना आणल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासोबतच येथील सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. महिला आयोगाच्या बैठकीत ससून रुग्णालयाबाबत पुणे पोलिसांनी भूमिका मांडली. सोबतच येथे पोलीस चौकी सुरू करण्यासाठी तत्काळ निर्दोश दिल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसात पोलीस चौकी उभाकरून कामकाज सुरु केले जाणार आहे. ससून रुग्णालय पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे शासकीय रुग्णालय, प्रचंड रुग्ण संख्या असणारे व दररोज सर्वात जास्त रुग्णांची वर्दळ असणारे रुग्णालय आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

२४ तास पोलिस कर्मचारी

ससून रुग्णालयामध्ये साधारणपणे  दररोज हजारो रुग्ण व त्यांचे नातेवाईक येथे येतात. गेल्या काही काळात या परिसरात चोरी, मारहाण, इतर किरकोळ गुन्ह्यांच्या घटना वाढ झाली आहे. त्याच्या तक्रारी देखील सातत्याने होत आहेत. सोबतच या परिसरात गुन्हेगारांना अनेकवेळा उपचारासाठी किंवा तपासणीसाठी आणले जाते. तेव्हा, त्यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते व साथीदार येत असतात. त्याचा त्रास रुग्णालय तसेच पोलीस यंत्रणेवर पडतो. तसेच, अनेक घटना आरोपींनी रुग्णालयातून बेड्यासहित पलायन केल्याच्या घडलेल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी अमितेश कुमार यांनी तात्काळ पावले उचलत रुग्णालयात पोलीस चौकी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ससून रुग्णालयामध्ये पोलीस चौकी सुरू झाल्यानंतर रुग्णालयाच्या परिसरात २४ तास पोलीस कर्मचारी तैनात राहतील, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि तात्काळ कारवाई करणे शक्य होईल. शिवाय, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना तक्रार नोंदवण्यास रुग्णालयातून बाहेर पडण्याची गरज भासणार नाही. त्यापुढे त्यांना पोलिसांची तात्काळ मदत मिळू शकेल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. निर्णयाचे नागरिक व रुग्णालय प्रशासनाने स्वागत केले.

रुग्णालयामधून आरोपींनी काढला पळ

पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहेत. ससूनमध्ये ड्रग्ज रॅकेट देखील समोर आले होते. ड्रग्ज माफिया ललित पाटील हा देखील पळून गेला होता. त्याचबरोबर मागील आठवड्यामध्ये देखील ससूनमधून एका आरोपीने पळ काढला होता. रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाला होता. संतोष सचिन साठे असं ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. यानंतर ससूनमधील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. यानंतर आता ससूनमध्ये पोलीस चौकी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Decision to set up a police post for security at sassoon hospital in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Police
  • Sasoon Hospital

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.