Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेत अंडी वितरणाच्या निर्णयाला भाजपचा तीव्र विरोध; शिंदे गटातील मंत्र्यांना दिली कडधान्यांची पाकीटं

शालेय शिक्षण विभागाने मध्यान्ह भोजनामध्ये विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटात असणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या या निर्णयाला भाजपकडून कडधान्याची पाकीट देऊन विरोध केला जातो आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 06, 2024 | 05:14 PM
शाळेत अंडी वितरणाच्या निर्णयाला भाजपचा तीव्र विरोध; शिंदे गटातील मंत्र्यांना दिली कडधान्यांची पाकीटं
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर: राज्यामध्ये सध्या नवीन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) मध्यान्ह भोजनामध्ये (Mid-day meal) विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटात असणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी घेतलेल्या या निर्णयाला भाजपकडून (BJP) विरोध केला जातो आहे. विद्यार्थ्यांना अंडी (Egg Delivery) देण्याच्या निर्णयावरुन भाजप जैन सेलने (BJP Jain Cell) आक्रमक भूमिका घेत केसरकरांना कडधान्याची पाकीट पाठवली आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. यामध्ये आता विद्यार्थ्यांना अंडी देखील देता येतील असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याकरिता स्थानिक बाजारातून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना अंडी आणि फळे घेता येणार आहेत. त्यासाठी पहिल्या सहा आठवड्यांच्या खर्चासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे ३० रुपये खर्च दिला जाणार आहेत. परंतु शालेय पोषण आहारात अंडी देऊ नये, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहेत.

भाजप जैन सेलकडून अंडी देण्यास तीव्र विरोध केला आहे, मंत्री केसरकर यांच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी भाजपा जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी कोल्हापूरमधून केसरकरांना कडधान्यांची पाकीट पाठवली आहेत. कोल्हापूर येथील पोस्ट ऑफिसमधून ही कडधान्याची पाकीट पाठवत अनोख्या पद्धतीने विरोध दर्शवण्यात आला आहे. हा अंडी वितरणाचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातून दीपक केसरकर यांना मोठ्या संख्येने कडधान्याची पाकीटे पाठवण्याचा निर्धार भाजप जैन सेलने केला आहे. याचबरोबर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक जणांच्या भावना दुखावल्या गेल्याची भावना व्यक्त केली आहे. यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात भाजपातील लोकांची नाराजी समोर आली आहे.

Web Title: Deepak kesarkars decision of distribution eggs in schools strongly opposes by bjp nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2024 | 05:14 PM

Topics:  

  • BJP
  • CM Eknath Shinde Group
  • Deepak Kesarkar

संबंधित बातम्या

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गावच्या घरी गौराईचे आगमन 
1

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गावच्या घरी गौराईचे आगमन 

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?
2

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
3

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
4

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.