
PCMC Co-opted Corporator, Pimpri Chinchwad News, PCMC General Body Meeting,
सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते. पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहून सभा १५ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याचे महापौरांनी जाहीर केले. विशेष म्हणजे, या सभेच्या विषयपत्रिकेवर स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय क्रमांक एकवर होता. ऑगस्ट महिन्याच्या मूळ सभेत महापौरांच्या पत्रामुळे हा विषय पटलावर आला होता. मात्र, त्यावेळी तहकूब झालेली सभा गुरुवारीही विनाकामकाज संपल्याने निर्णय पुन्हा रखडला.
बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई
सत्ताधारी भाजपकडे स्वीकृत नगरसेवकपदासाठी तब्बल दीडशे ते दोनशे जणांनी फिल्डिंग लावली आहे. यात जुने निष्ठावंत, नव्याने दाखल झालेले कार्यकर्ते, स्थानिक आमदारांचे समर्थक, हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि निवडणुकीत पडद्याआड मदत करणारे चेहरे अशा विविध गटांत तीव्र स्पर्धा आहे. भाजपच्या वाट्याला येणाऱ्या सात नावांवर अंतर्गत एकमत होत नसल्यानेच ही निवड वारंवार पुढे ढकलली जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या तीन जागांसाठीचे अर्ज छाननीत वैध ठरले असून, त्यावर केवळ सभागृहाची अधिकृत मोहोर उमटणे बाकी आहे.
गुरुवारी पार पडलेल्या या सभेभोवती प्रशासकीय गोंधळाचे सावट पाहायला मिळाले
वेळेतील बदल: सर्वसाधारण सभा नेहमी दुपारी दोन वाजता होते. मात्र, गुरुवारी ही सभा अचानक दुपारी एक वाजता बोलावण्यात आली. वेळेतील बदलाची पूर्वकल्पना नसल्याने अनेक नगरसेवक नेहमीच्या वेळेनुसार दोन वाजता महापालिकेत पोहोचले, तोपर्यंत सभा तहकूब झाली होती.
हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन
कोरमचा अभाव: १२८ नगरसेवकांच्या सभागृहात कामकाजासाठी किमान एक-तृतीयांश म्हणजेच ४३ नगरसेवकांची उपस्थिती (कोरम) आवश्यक असते. प्रत्यक्षात निम्म्याहून अधिक नगरसेवक अनुपस्थित होते. कोरमअभावी कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
नागरी प्रश्न ऐरणीवर: सलग दुसऱ्यांदा सभा तहकूब झाल्यामुळे केवळ स्वीकृत नगरसेवकांचा विषयच नव्हे, तर शहरातील महत्त्वाचे विकासप्रकल्प, नागरी समस्या आणि प्रशासकीय प्रस्तावांवरील निर्णयही ठप्प झाले आहेत.
वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या या सभेमुळे “स्वीकृत नगरसेवकांची निवड नक्की होणार की केवळ गाजरच दाखवले जाणार?”, असा संतप्त सवाल आता पक्षांतर्गत इच्छुकांमधून उपस्थित केला जात आहे. आता १५ ऑक्टोबरला तरी सभागृह प्रत्यक्ष कामकाजाला सामोरे जाणार की पुन्हा तहकुबीचे अस्त्र उगारले जाणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.