Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

PM Narendra Modi Birthday: ३४ वर्षांनंतरही, हा फोटो आपल्याला राष्ट्रीय एकतेच्या दृढनिश्चयाने सुरू झालेल्या प्रवासाची आठवण करून देतो. एका तरुण संघटकापासून ते राष्ट्राच्या नेत्यापर्यंत, हा प्रवास आजही सुरू आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 17, 2026 | 09:26 AM
PM Narendra Modi Birthday, PM Modi Lal Chowk Photo,

PM Narendra Modi Birthday, PM Modi Lal Chowk Photo,

Follow Us
Follow Us:
  • १७ सप्टेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम
  • भाजपकडून ३४ वर्षे जुना श्रीनगरच्या लाल चौकातील नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक फोटो शेअर
  • २६ जानेवारी १९९२ रोजी भाजप अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत केले होते ध्वजारोहण
PM Narendra Modi Birthday Special 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर) वाढदिवस असून त्यानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘सेवा संकल्पा’ सोबतच, त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, ३४ वर्षांपूर्वीचा श्रीनगरच्या लाल चौकाचा एक प्रतिष्ठित फोटो शेअर केला आहे.

३४ वर्षांपूर्वी खोऱ्याच्या मध्यभागी उभे होते तरुण मोदी”

भाजपने हा ऐतिहासिक फोटो पोस्ट करत लिहिले आहे:

“हा तो प्रसिद्ध फोटो आहे ज्याबद्दल आपण सर्व बोलत होतो. ३४ वर्षांपूर्वी, तरुण नरेंद्र मोदी काश्मीर खोऱ्याच्या मध्यभागी अशा वेळी खंबीरपणे उभे होते, जेव्हा श्रीनगरच्या लाल चौकात पोहोचणे हे अत्यंत कठीण आणि मोठ्या सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासारखे होते.”

मोठी बातमी ! मनोज जरांगेंनी अखेर 20 दिवसानंतर उपोषण घेतले मागे; राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत

२६ जानेवारी १९९२ चा अविस्मरणीय फोटो

या फोटोची पार्श्वभूमी सांगताना भाजपने ‘एकता यात्रे’च्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 भाजपचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भव्य ‘एकता यात्रा’ काढण्यात आली होती. या ऐतिहासिक यात्रेचे नियोजन आणि आयोजनाची संपूर्ण धुरा भाजपचे तत्कालीन तरुण संघटक नरेंद्र मोदी यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली होती.

या यात्रेची सांगता २६ जानेवारी १९९२ रोजी अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी हे डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून तिथे उपस्थित होते. “कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत राष्ट्रीय एकतेचा संदेश देणाऱ्या एकता यात्रेत तरुण नरेंद्र मोदी यांची भूमिका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी होती.”

— भारतीय जनता पक्ष (BJP)

मुख्यमंत्री योगींकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले, “आपल्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात, नरेंद्र मोदींनी सेवा हे आपले ध्येय, सुशासन हा आपला संकल्प आणि राष्ट्रउभारणी हे आपले सर्वोच्च उद्दिष्ट बनवून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात बदलाची नवी जाणीव जागृत केली आहे. आज, त्यांच्या ७६ व्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी, बाबा विश्वनाथांचे पवित्र शहर असलेल्या वाराणसी येथून ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू केले जाईल.”

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…

त्यांचे जीवन म्हणजे अढळ निश्चयाची गाथा- अमित शाहा

पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करताना अमित शाह म्हणाले, “त्यांचे जीवन म्हणजे अढळ निश्चयाची गाथा आहे.” केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकापाठोपाठ एक पोस्ट करून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमित शाह यांनी लिहिले, “अथक परिश्रम, त्याग आणि दूरदृष्टीचे प्रतीक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मोदीजींनी कर्माला आध्यात्मिक साधना आणि राष्ट्रसेवेला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले आहे. त्यांचे जीवन म्हणजे साधेपणा, त्याग आणि अढळ निश्चयाची गाथा आहे. सेवा आणि समर्पणाने भरलेला त्यांचा प्रवास लाखो देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे. आम्ही प्रार्थना करतो की ते दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत राहील आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत राहील.”

१७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातच्या वडनगर येथे नरेंद्र मोदींचा जन्म

पंतप्रधान मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातच्या वडनगर येथे झाला. ते २६ मे २०१४ पासून पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते तिसऱ्यांदा पंतप्रधान आहेत. ते देशातील सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले व्यक्ती आहेत. ते वाराणसीचे खासदार आहेत. त्यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. या वर्षी त्यांच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण होत आहेत.

𝐇𝐞𝐫𝐞’𝐬 𝐭𝐡𝐞 𝐢𝐜𝐨𝐧𝐢𝐜 𝐩𝐡𝐨𝐭𝐨 𝐰𝐞 𝐰𝐞𝐫𝐞 𝐭𝐚𝐥𝐤𝐢𝐧𝐠 𝐚𝐛𝐨𝐮𝐭. ⬇️ 34 years ago, young Shri @narendramodi stood in the heart of the Valley, at a time when reaching Lal Chowk itself meant navigating extraordinary security challenges. The Ekta Yatra, led by… pic.twitter.com/xJSY3c8Vbg — BJP (@BJP4India) September 17, 2026

Web Title: National newspm narendra modi birthday bjp shares 34 year old historic lal chowk srinagar photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • BJP
  • narendra modi
  • PM Modi
  • PM Narendra Modi Birthday
  • RSS

संबंधित बातम्या

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं
1

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं

Mumbai Housing Project: मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप
2

Mumbai Housing Project: मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप

Ulhasnagar Metro Project: मेट्रोचे श्रेय भाजपचे की शिवसेनेचे? शहाड ब्रिजवरूनही राजकीय संघर्ष; कुमार आयलानी विरुद्ध कमलेश निकम
3

Ulhasnagar Metro Project: मेट्रोचे श्रेय भाजपचे की शिवसेनेचे? शहाड ब्रिजवरूनही राजकीय संघर्ष; कुमार आयलानी विरुद्ध कमलेश निकम

Raj Thackeray: ‘…स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील’, गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले
4

Raj Thackeray: ‘…स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील’, गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.