Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खारघर कोस्टल रोड सुरू होण्यासाठी विलंब; वन विभागाच्या परवानग्यांचा अडथळा, २०२९ मध्ये पूर्ण होणार

खारघरच्या कोस्टल रोड मार्गिकेसाठी विलंब होणार असल्याचे सध्या चित्र आहे. वन विभागाकडून परवानगी वेळीच मिळत नसल्याने हा प्रकल्प २०२६ मध्ये सुरू होईल असे सध्या दिसून येत आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 17, 2025 | 11:55 AM
खारघर कोस्टल रोडला होणार विलंब

खारघर कोस्टल रोडला होणार विलंब

Follow Us
Close
Follow Us:
  • खारघर कोस्टल रोड मार्गिका 
  • वन विभागाकडून परवागनी येण्यास विलंब
  • उशिरा सुरू होणार काम 

नवी मुंबईः नवी मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा खारघर कोस्टल प्रस्तावित मार्गिकाच्या प्रकल्पाच्या निर्माणास वन विभागाच्या परवानग्या मिळाल्यानंतर २०२६ मध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी असलेल्या या प्रकल्पामुळे खारघर, नेरुळ आणि बेलापूर भागातील वाहतुक सुलभ होणार आहे. हा प्रकल्प २०२९ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

सध्या बेलापुर किल्ला गावठाण भागात मार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी नियमित बाब झाली आहे. विमानतळ सुरू झाल्यावर वाहनांची संख्या वाढणार आहे. अशात वाहतूक कोंडीत अधिक भर पडणार आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खारघर कोस्टल रोड पर्यायी ठरण्याची शक्यता आहे. विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक होणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियोजनासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहे

२०२६ मध्ये खारघर कोस्टलच्या निर्माणास सुरुवात

  • २०२९ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता
  • ९.६८ किमी लांबीचा मार्ग
  • ३० मीटर रुंदी अशी असणार रचना
  • ६.६९ किमीची मार्गिका पूर्णपणे नव्याने बांधणार
  • २.९९ किमी मार्गिकाही पूर्वीच्याच मार्गिकत दुरुस्तीने जोडणार

वाहतूक कोंडीवर पर्याय उपलब्ध होणार

खारघरमधील जलमार्ग सेक्टर १६ पासून खारघर रेल्वे स्थानकाजवळील पीएमएवाय गृहनिर्माण योजनेर्पत तसेच नेरुळमधील भुमिगत मार्गापर्यंत हा प्रकल्प विस्तारित केला जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडीवर देखील पर्याय उपलब्ध होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे शीव पनवेल मार्गावरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. २०२६ मध्ये सुरु‌वातीच्या काही महिन्यांत या प्रकल्पाच्या निर्माणास सुरुवात होणार असून २०२९ मध्य प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.

प्रवास होणार आणखी सुसाट! वर्सोवा कोस्टल रोड इतर रस्त्यांनाही जोडणार, मुंबई महानगरपालिका संपादित करणार ३५० हेक्टर जमीन

विमानतळाला जोडण्यासाठी महत्त्वाचा मार्ग

नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्याचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, विमानतळाच्या निर्मितीमुळे भविष्यात रस्ते मार्गावरही वाहनांचा भार वाढणार आहे. त्यामुळे या विमानतळाला जोडण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

सहा वाहिन्यांचा मार्ग

या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. हा मार्ग सहा वाहिन्यांचा असेल. त्यामुळे भविष्यातील या मार्गावरील प्रवास वेगवान असेल.९.६८ किमी लांबीचा असून त्यापैकी ६.६९ किमीची मार्गिका पूर्णपणे नव्याने बांधली जाणार आहे. तर २.९९ किमी मार्गिकाही पूर्वीच्याच मार्गिकेत दुरुस्ती करून ती या प्रकल्पाला जोडली जाणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या आर्थिक घडीला देखील चालना मिळणार आहे.

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Web Title: Delay in commencement of kharghar coastal road forest department clearances hamper work to be completed in 2029

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • coastal road
  • kharghar
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

प्रवास होणार आणखी सुसाट! वर्सोवा कोस्टल रोड इतर रस्त्यांनाही जोडणार, मुंबई महानगरपालिका संपादित करणार ३५० हेक्टर जमीन
1

प्रवास होणार आणखी सुसाट! वर्सोवा कोस्टल रोड इतर रस्त्यांनाही जोडणार, मुंबई महानगरपालिका संपादित करणार ३५० हेक्टर जमीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.