वर्सोवा कोस्टल रोड इतर रस्त्यांनाही जोडणार, प्रवास होणार आणखी सुसाट! मुंबई महानगरपालिका संपादित करणार ३५० हेक्टर जमीन
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हाती घेतलेल्या वर्सोवा ते दहिसर असा कोस्टल रोड इतर रस्त्यांना जोडणारा बनवला जाईल, या प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिका मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पासाठी महानगरपालिका सल्लागार नियुक्त करेल आणि या कामासाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत.
या प्रकल्पाला नुकतीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तत्वतः मान्यता दिल्यानंतर, आता भूसंपादन प्रक्रियेसाठी मुंबई महानगरपालिका एकूण ३५० हेक्टर जमीन संपादित करणार आहे. सहा टप्प्यात बांधल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची किंमत १६,६२९ कोटी रुपये आहे. अंदाजे २२ किमी लांबीचा आहे. त्यामुळे प्रवासाला गती मिळेल, असे सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या नरिमन पॉईंट ते बांद्रे हा कोस्टल रोड सुरू असून, त्याचा पुढचा टप्पा वर्सोवा ते भाईंदर असा प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे वसींवा ते भाईंदर या मार्गावरील प्रवासाचा वेळ ९०-१२० मिनिटांवरून केवळ २०-२५ मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.
सल्लागारामार्फत प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ३४६ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण, मूल्यांकन, भरपाई आणि पुनर्वसनाशी संबंधित प्रशासकीय व कायदेशीर बाबी हाताळल्या जाणार आहेत. या जमिनीत खासगी मालमत्ता, मच्छीमार वस्ती तसेच काही शासकीय जमिनींचा समावेश आहे. वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोड हा सुमारे ६० किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गामध्ये उन्नत पूल, बोगदे आणि आंतरजोड रस्त्यांचा समावेश असेल.
Mumbai News: महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर तब्बल 51, 582 झोपड्या, पुनर्विकास रखडला
या प्रकल्पाचे काम सहा टप्य्यात केले जाणार आहे.






