
मुंबई : सत्ता स्थापन स्थापन झाल्यानतंर पहिल्यांदाच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज भेट घेतली. यावेशी दोघांमध्ये चर्चा सुमारे दीड तास चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तर, फडणवीसांनी राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती आहे.
नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. तब्बल तासभर दोघांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवतीर्थवर ही भेट घेतल्यचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या दोघांच्या भेटीत आगामी पालिका निवडणुकीबाबत खलबतं झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्र लिहून कौतुक केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आज देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्याच्या उद्देशाने ही भेट नियोजित आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया पार पडली. या काळात त्यांची भेट घेणं शक्य न झाल्यामुळे फडणवीस त्यांच्या भेटीसाठी गेल्याचं म्हटलं जातं आहे.