Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण ग्रामीणमध्ये राजकीय ट्विस्ट! भाजपमध्ये गेलेले कार्यकर्ते दोन दिवसांतच मनसेत परत; खोणी गावात राजकीय चर्चांना उधाण

कल्याण ग्रामीणमधील खोणी गावात दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी गैरसमजामुळे पक्षप्रवेश झाल्याचा दावा करत पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे. विचारधारा आणि निष्ठा मनसेशीच असल्याचे सांगत त्यांनी घरवापसी केली. या राजकीय घडामोडीमुळे कल्याण ग्रामीणच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 03, 2026 | 12:51 PM
कल्याण ग्रामीणमध्ये राजकीय ट्विस्ट! भाजपमध्ये गेलेले कार्यकर्ते दोन दिवसांतच मनसेत परत; खोणी गावात राजकीय चर्चांना उधाण

कल्याण ग्रामीणमध्ये राजकीय ट्विस्ट! भाजपमध्ये गेलेले कार्यकर्ते दोन दिवसांतच मनसेत परत; खोणी गावात राजकीय चर्चांना उधाण

Follow Us
Follow Us:
  • खोणी गावातील भाजपप्रवेश केलेले कार्यकर्ते पुन्हा मनसेत
  • गैरसमजातून प्रवेश केल्याचा दावा
  • कल्याण ग्रामीणमध्ये राजकीय ट्विस्ट
डोंबिवली : कल्याण ग्रामीणमधील खोणी गावात राजकीय घडामोडींना अचानक वेग आला असून, दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही कार्यकर्त्यांनी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) पुनरागमन केले आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.भाजपमध्ये प्रवेश हा गैरसमजातून झाल्याचा दावा करत संबंधित कार्यकर्त्यांनी मनसेत पुनरागमन केले.

संबंधित कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या स्पष्टीकरणात, काही राजकीय घडामोडी आणि गैरसमजांमुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केला होता, असे नमूद केले. मात्र, विचारधारा, पक्षनिष्ठा आणि स्थानिक पातळीवरील बांधिलकी मनसेशीच असल्याची जाणीव झाल्यानंतर पुन्हा पक्षात परतण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोठी बातमी ! पक्षाचा आदेश मानून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या सिद्धरामय्या यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

खोणी गावातील या घडामोडीमुळे कल्याण ग्रामीणच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक पातळीवर पक्षांतराचे राजकारण रंगत असताना संबंधित कार्यकर्त्यांच्या घरवापसीला मनसेने संघटनात्मक बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. तर भाजपकडून या घडामोडीवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. खोणी गावातील या राजकीय घडामोडींमुळे आगामी स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या घरवापसीचे मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले असून, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. खोणी गावातील या पुनरागमनामुळे मनसेला संघटनात्मक बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आणि सतत चर्चेत राहणारा मतदारसंघ मानला जातो. शहरालगत ग्रामीण पट्टा, झपाट्याने होणारे शहरीकरण, गावपातळीवरील सामाजिक समीकरणे आणि विविध पक्षांचे वाढते प्रभावक्षेत्र यामुळे येथे राजकारण नेहमीच गतिमान राहिले आहे.

या मतदारसंघात स्थानिक प्रश्न, विकासकामे, जमीन विषयक मुद्दे, पायाभूत सुविधा, पाणीटंचाई, रस्ते, अनधिकृत बांधकामे आणि ग्रामपंचायत स्तरावरील सत्ता समीकरणे हे निवडणुकांतील प्रमुख मुद्दे ठरतात. खोणी, उसरघर, नांदिवली, टिटवाळा परिसरासह अनेक गावांमध्ये पक्षीय ताकद स्थानिक नेत्यांच्या प्रभावावर अवलंबून असते.

Karnataka Politics : डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची मल्लिकार्जुन खर्गेंसह राहुल गांधींसोबत चर्चा

Web Title: Khoni village bjp workers return mns kalyan rural political news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • BJP
  • kalyan
  • MNS

संबंधित बातम्या

Maharashtra Political: महायुतीमध्ये वाढती दरी! फडणवीसांच्या बैठकीला शिंदे अनुपस्थित; जागावाटपाचा वाद चिघळला
1

Maharashtra Political: महायुतीमध्ये वाढती दरी! फडणवीसांच्या बैठकीला शिंदे अनुपस्थित; जागावाटपाचा वाद चिघळला

Sanjay Raut PC: ‘स्वाभिमान जागा झाला असेल तर मातोश्रीवर या’; अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर संजय राऊतांचे खुले आव्हान
2

Sanjay Raut PC: ‘स्वाभिमान जागा झाला असेल तर मातोश्रीवर या’; अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर संजय राऊतांचे खुले आव्हान

Mamata Banerjee: “थांबा, यापेक्षा मोठा ‘खेळ’ करणार…” ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा; बंगाल पोलिसांवरून हिटलरशी केली तुलना
3

Mamata Banerjee: “थांबा, यापेक्षा मोठा ‘खेळ’ करणार…” ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा; बंगाल पोलिसांवरून हिटलरशी केली तुलना

भाजपाकडून राजेंद्र राऊतांनी दाखल केला अर्ज, जोरदार शक्तीप्रदर्शन, दिग्गजांची उपस्थिती
4

भाजपाकडून राजेंद्र राऊतांनी दाखल केला अर्ज, जोरदार शक्तीप्रदर्शन, दिग्गजांची उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.