Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunetra Pawar: जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची अहिल्यानगर भेट; राजकीय हालचालींना वेग

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अहिल्यानगरला धावती भेट देत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसह जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींवर स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 30, 2026 | 05:59 PM
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची अहिल्यानगर भेट; राजकीय हालचालींना वेग

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची अहिल्यानगर भेट; राजकीय हालचालींना वेग

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची अहिल्यानगर भेट
  • राजकीय हालचालींना वेग
  • जिल्हा बँक निवडणुकीवर मंथन
पोपट पिटेकर,अहिल्यानगर: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बीड दौऱ्यावर जात असताना पहिल्यांदाच अहिल्यानगर शहरात धावत्या भेटीसाठी थांबल्या. त्यांच्या या अचानक झालेल्या भेटीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे शहरात जंगी स्वागत करत त्यांच्यासोबत विविध राजकीय आणि विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली.

जिल्हा बँक निवडणुकीवर मंथन

या भेटीदरम्यान आगामी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसह जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. सहकार क्षेत्रातील घडामोडी, संघटनात्मक तयारी आणि आगामी निवडणुकांची रणनीती यावरही दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर विचारविनिमय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Marathi Language: मराठी सक्तीवर राजकारण सुरू; पण मीरा-भाईंदरातील रिक्षाचालकांनी दाखवली भाषेप्रती सकारात्मक भूमिका

प्रलंबित विकासकामांचाही आढावा

राजकीय चर्चेबरोबरच जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रशासकीय कामे, नागरी सुविधा आणि विकास प्रकल्पांचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत होणार उच्चस्तरीय बैठक

अहिल्यानगर शहरातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत लवकरच स्वतंत्र उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

त्यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील पायाभूत सुविधा, नागरी विकास, प्रशासनाशी संबंधित प्रलंबित विषय आणि विविध विकासकामांबाबत या बैठकीत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.

राजकीय चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ही अहिल्यानगरमधील पहिली धावती भेट असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्यातील राजकीय हालचालींनाही वेग आल्याची चर्चा सुरू आहे. या भेटीमुळे सहकार, स्थानिक राजकारण आणि विकासाच्या मुद्द्यांवर आगामी काळात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Satara News: ‘विठू नामाचा गजर’ अन् पारंपरिक खेळांची रेलचेल; श्री क्षेत्र देऊरमध्ये गोपाळकाला उत्साहात

Web Title: Deputy cm sunetra pawar visits ahilyanagar discusses district bank election and political developments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Bank
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम
1

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या
2

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
3

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
4

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.