
NCP MLAs donate one month salary to Maharashtra farmers
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत राष्ट्रवादीच्या आमदारांनी शेतकऱ्यांसाठी एक महिन्याचा पगार देणार असल्याचे जाहीर केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले.
‘मफलर मॅन’वरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…
सुनेत्रा पवार यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आमदारांनी आपले १ महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा पुढाकार! राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आमदारांनी आपले १ महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान या वेतनाचा धनादेश माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. शेतकरी बांधवांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देणे, हीच आदरणीय अजितदादांनी आपल्याला दिलेली खरी शिकवण आहे. दादांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेत, शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी योगदान देणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शेतकरी बांधवांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहणे, हाच यामागचा प्रामाणिक भाव आहे. 📍 मंत्रालय, मुंबई — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) November 17, 2026
पुढे त्यांनी लिहिले, “शेतकरी बांधवांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देणे, हीच आदरणीय अजितदादांनी आपल्याला दिलेली खरी शिकवण आहे. दादांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेत, शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी योगदान देणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शेतकरी बांधवांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहणे, हाच यामागचा प्रामाणिक भाव आहे.”
Ans: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला.
Ans: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
Ans: शेतकरी संकटात असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मदत करणे ही सामूहिक जबाबदारी असून, हीच अजित पवारांची शिकवण असल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले.