Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! शेतीसाठी AI धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा महत्त्वाचे निर्णय

Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 17, 2025 | 03:37 PM
मोठी बातमी ! शेतीसाठी AI धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा महत्त्वाचे निर्णय (फोटो सौजन्य-X)

मोठी बातमी ! शेतीसाठी AI धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा महत्त्वाचे निर्णय (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Cabinet Meeting In Marathi:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (17 जून) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत दहा प्रमुख निर्णय घेण्यात आले आणि राज्यात शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाला मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांचे मानधन दुप्पट करण्यात आले आहे. महाराष्ट्र कृषी- कृत्रिम बुद्धिमत्ता महाकृषी- कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५ ते २०२९ पर्यंत मंजूर करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले जाईल. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरेल.तसेच धारावीचा पुनर्विकास आणि अनिवासी भारतीयांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्याला पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे; ‘या’ जिल्ह्यांत वरूणराजा कहर करणार, वाचाच… 

✅ ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मौजे जांबुटके येथील २९ हेक्टर ५२ आर जमीन. आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन, रोजगार निर्मिती व आर्थिक विकासास चालना मिळणार. (महसूल विभाग)

✅ एमएमआरडीए आणि मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटर लि. यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत. सार्वजनिक, खासगी भागिदारीतून हा राज्यातील पहिलाचा मोठा प्रकल्प. ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार. (महसूल विभाग)

✅ मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ. विद्यापीठाला स्व-मालकीची इमारत मिळणार. हजारो विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार. (महसूल विभाग)

✅ धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी (SPV) आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ. लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने, पुनवर्सन व पुनर्विकास योजनेला गती लाभणार. योजनेची अंमलबजावणी सुलभ रीतीने होणार. (महसूल विभाग)

✅ केंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची (AWS- Automatic Weather Station) उभारणी करण्यात येणार. यासाठी महावेध प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय. राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठीचा प्रकल्प. शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषि विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी महत्वाचा प्रकल्प. (कृषि विभाग)

✅ महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर. कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडविता येणार. कृत्रिम बुद्धीमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स, पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत, राज्यातील ॲग्रीस्टॅक, महा-ॲग्रीस्टेक, महावेद, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार. (कृषि विभाग)

✅ मुंबई मेट्रो मार्ग-२अ, २ ब आणि ७ या मेट्रो प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ. (नगरविकास विभाग)

✅ विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता “बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा” या तत्त्वावर हाती घेण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग).

✅ आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ. हयात जोडीदारालाही मानधन मिळणार. गौरव योजनेमध्ये सुधारणा. (सामान्य प्रशासन विभाग).

✅ अनिवासी भारतीयांच्या मुलांना, पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार. विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल. प्रवेश व शुल्क यांचे विनियमन अधिनियम, २०१५ मध्ये सुधारणा. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

Sharad Pawar News: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा…?; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला

Web Title: Devendra fadnavis cabinet ai policy for agriculture approved double the honorarium of those imprisoned during the emergency 10 big decisions in the cabinet meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Farmers
  • Mumbai

संबंधित बातम्या

चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश
1

चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश

Rashmi Shukla retirement : महाराष्ट्राच्या DGP रश्मी शुक्ला झाल्या निवृत्त; सदानंद दातेंनी स्वीकारला पदभार
2

Rashmi Shukla retirement : महाराष्ट्राच्या DGP रश्मी शुक्ला झाल्या निवृत्त; सदानंद दातेंनी स्वीकारला पदभार

Sangli News: सांगलीतून भाजपचा प्रचाराचा नारळ फुटला, महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवू- देवेंद्र फडणवीस
3

Sangli News: सांगलीतून भाजपचा प्रचाराचा नारळ फुटला, महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवू- देवेंद्र फडणवीस

Purandar News: शेतकरी महिलांनी केली राईस मिल कंपनीची पायाभरणी; ‘उमेद’च्या माध्यमातून…
4

Purandar News: शेतकरी महिलांनी केली राईस मिल कंपनीची पायाभरणी; ‘उमेद’च्या माध्यमातून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.