विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची ऑफर; शरद पवारांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
Sharad Pawar Pune News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चां राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबत दिवसेंदिवस अनेक बातम्याही समोर येत असतात. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एका वाक्यात युतीच्या चर्चा धुडकावून लावल्या आहेत. “जे सत्तेसाठी भाजपसोबत गेले, अशा संधीसाधू लोकांना आपल्या सोबत घ्यायचे नाही.” असं सांगत शरद पवार यांनी युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. इतकेच नव्हे तर गांधी, नेहरू, शाहु,फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे लोकांना सोबत घ्यायचं आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आज पुण्यात संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी युतीच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानिमित्त शरद पवार यांच्या पक्षाचा मेळावा पार पडला. शरद पवार यांनी काँग्रेस आणि पुणे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासावर थोडक्यात प्रकाश टाकला. “या परिसरात काँग्रेसचा विचार खोलवर रुजलेला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. “आपल्याला आता नव्या नेतृत्वाची फळी उभी करावी लागेल. या नेतृत्वाच्या माध्यमातून विकासकामे पुढे न्यावीत.” त्यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडमधील नगरपालिका व महापालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होत्या. मात्र, मध्यंतरात काही गोंधळ झाल्याने भाजपाला सत्ता मिळाली. ही सत्ता पुन्हा आपल्या हातात यावी यासाठी संघटनेला बळकट करत नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याची वेळ आली आहे,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
मोठी बातमी ! शेतीसाठी AI धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा महत्त्वाचे निर्णय
यावेळी बोलताना शरद पवार यांनी पक्षाची राजकीय दिशा स्पष्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेलेले नेते आणि पक्षाची साथ सोडून गेलेल्या नेत्या सोबत घेणार नसल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, शरद पवारांच्या भूमिकेमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण राहणार आणि कोण दुसऱ्या गटात सामील होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संधीसाधुपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही, सत्तेसाठी जायचं ही भूमिका असेल तर हा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार नाही. कुणाशीही संबंध ठेवा, भाजपशी नको. संधीसाधुपणाचं राजकारण आपल्याला लोकशाहीत करायचं नाही. अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.
संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी झटपट बनवा मखाणा रायता, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक पदार्थ
१९८० च्या निवडणुकीत घडलेला एक संस्मरणीय किस्साही यावेळी शरद पवार यांनी सांगितला. ” १९७८ मध्ये मी मुख्यमंत्री असताना १९८० च्या निवडणुकीत आमच्या पक्षाचे ७० आमदार निवडून आले. पण त्यातील सहा जण वगळता, सर्वजण आपल्याला सोडून गेले. पण, जनतेने इतका मोठा जनाधार दिला असतानाही आपल्याला इतके सगळे लोक सोडून गेल्यामुळे या घटनेने त्यांना प्रश्न मला पडला. त्यानंतर मी पुन्हा पक्षाकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. त्यानंतर जे आमदार मला सोडून गेले होते, त्यापैकी ९१ टक्के जणांचा निवडणुकीत पराभव झाला. यातून त्यांनी एक धडा शिकायला मिळाला की, कोण येते, कोण जाते याचा फारसा विचार करू नका. या देशाची लोकशाही नेत्यांमुळे नव्हे, तर जनतेमुळे टिकून आहे, असे शरद पवारांनी ठामपणे नमुद केलं.