Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी 2100 कोटी रुपयांची मदत जाहीर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

Maharashtra Goverment Cabinet Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देत मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 23, 2025 | 03:55 PM
शेतकऱ्यांसाठी 2100 कोटी रुपयांची मदत जाहीर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय (फोटो सौजन्य-X)

शेतकऱ्यांसाठी 2100 कोटी रुपयांची मदत जाहीर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Goverment Cabinet Decision News In Marathi: गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तातडीने मदतीची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून २१०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (23 सप्टेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. ही रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत इतरही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

सीना नदीने धारण केले रौद्ररूप; महापूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, नदीकाठच्या गावांना…

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

(आरोग्य विभाग)
शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी, तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी मिळणार. विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेतून रुग्णाच्या उपचाराच्या दाव्यातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यास मंजुरी.

(परिवहन विभाग)
नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला गती. या १९६.१५ कि.मी. नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज मधील रुपांतरणाच्या कामासाठी ४९१ कोटी ५ लाख रुपये खर्चाच्या तरतुदीस मान्यता.

(महसूल विभाग)
अकोल्यात शहर बस स्थानक, भाजी बाजार आणि वाणिज्य संकुलाला जागा. मौजे अकोला येथील २४ हजार ५७९.८२ चौ.मी. जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास मंजुरी.

(महसूल विभाग)
सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील कॉ. मिनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेने विकासककाच्या माध्यमातून बांधलेल्या घरांसाठी मुद्रांक व नोंदणी शुल्कात सवलत.

(महसूल विभाग)
वसई विरार शहर महानगरपालिकेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या इमारतीसाठी आचोळे ( ता. वसई, जि. पालघर) येथील जमीन देण्यास मंजुरी.

(महसूल विभाग)
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, नाशिकरोड यांना मौजे देवळाली (ता.जि. नाशिक ) येथील १०५५.२५ चौ.मी. जमीन देण्यास मान्यता.

(गृह विभाग)
मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती श्री. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल, शिफारशींसह स्वीकारला. तसेच अहवालातील निष्कर्ष, समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवरील कार्यवाहीचा कृती अहवाल स्वीकारला. यावर संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश.

(गृहनिर्माण विभाग)
मुंबईतील अंधेरी येथील सरदार वल्लभभाई पटेल नगर (एसव्हीपी नगर) येथे म्हाडाच्या माध्यमातून सामुहिक पुनर्विकास प्रकल्प राबवणार. याठिकाणच्या १२२ संस्थांच्या, तसेच ३०७ वैयक्तिक भुखंडावरील ४ हजार ९७३ सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव

Maharashtra Rain : पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; पुढील दोन ते तीन दिवस…

Web Title: Devendra fadnavis cabinet meeting decision rs 2100 crore assistance package for farmers in the state damaged by heavy rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis News: दिल्लीत मोठी जबाबदारीपासून पक्षातील छुपा विरोधापर्यंत..; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
1

Devendra Fadnavis News: दिल्लीत मोठी जबाबदारीपासून पक्षातील छुपा विरोधापर्यंत..; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

बळीराजाचे पीक गेले वाहून! CM देवेंद्र फडणवीस आणि DCM अजित पवारांनी केली सोलापूर पूरस्थितीची पाहणी
2

बळीराजाचे पीक गेले वाहून! CM देवेंद्र फडणवीस आणि DCM अजित पवारांनी केली सोलापूर पूरस्थितीची पाहणी

एसएसआयआय मंत्राम “मेड-इन-इंडिया” सर्जिकल रोबोट यात्रा मुंबईत दाखल
3

एसएसआयआय मंत्राम “मेड-इन-इंडिया” सर्जिकल रोबोट यात्रा मुंबईत दाखल

Mumbai News : लव्हलोकलची मुंबईतील प्रतिष्ठित सोसायटी स्टोअर्सशी भागीदारी, मुंबईत कुठे असणार?
4

Mumbai News : लव्हलोकलची मुंबईतील प्रतिष्ठित सोसायटी स्टोअर्सशी भागीदारी, मुंबईत कुठे असणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.