• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Heavy Rain In Solapur Sina River Overflow Huge Losses Due To The Flood

सीना नदीने धारण केले रौद्ररूप; महापूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, नदीकाठच्या गावांना…

मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, कधी नव्हे ते रौद्ररूप नदीने धारण केले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 23, 2025 | 02:56 PM
सीना नदीने धारण केले रौद्ररूप; महापूर आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

सीना नदीने धारण केले रौद्ररूप; महापूर आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मोहोळ / दादासाहेब गायकवाड : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. सध्या वरूणराजा सगळीकडेच बरसत असल्याने शेतकऱ्यांचे खूपच नुकसान होत आहे. सोलापूर जिल्ह्यासह सर्वत्र पडणाऱ्या पावसामुळे सीना नदीने रौद्ररूप धारण केल्याने सीना नदीला महापूर आला आहे.

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे. धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आसपासच्या इतर नद्यातून येणाऱ्या पाण्यामुळे सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा फार मोठा फटका बसला असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेदेखील वाचा : Solapur News : पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावाला आणखी गती मिळणार; जिल्हाधिकाऱ्यांनी मनुष्यबळासह 11 बोटी मागवल्या

दरम्यान, काही ठिकाणी नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले आहे. जनावरांचे ही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याचा विसर्ग वाढतच राहिला असल्यामुळे मोहोळकडून सोलापूरकडे जाणारी एकेरी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर सोलापूर पुणे हा महामार्ग पूर्णपणे बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी नदी काठी राहणाऱ्या सर्व गावकऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत व सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. सोलापूर-पुणे महामार्गाच्या वाहतूक पुलावर नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन देखील तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

सीना नदीने ओलांडली धोक्याची पातळी

मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, कधी नव्हे ते रौद्ररूप नदीने धारण केले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. या भागातील नदी लगत असणारी बोपले, मलिकपेठ, आष्टे, कोळेगाव, लांबोटी, नांदगाव येथील संपूर्ण पिके पाण्याखाली गेली आहेत. पुरामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, वरचेवर सीना नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे.

बचावकार्यासाठी एनडीआरएफचे जवान दाखल

नदीपात्रामधून सुरक्षितस्थळी शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान या ठिकाणी दाखल झालेले असून, सोमवार रात्रीपासून पाण्याची पातळी वरचेवर वाढतच आहे. सोमवारी संध्याकाळी आष्टे येथील काही शेतकऱ्यांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासन दक्ष असून, मंडलाधिकारी तसेच तलाठी हे यंत्रणेची पाहणी करून अडचणीतील शेतकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शेतकरी वर्गाला मदत पुरविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी सांगितले.

Web Title: Heavy rain in solapur sina river overflow huge losses due to the flood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Maharashtra Rain
  • Solapur News

संबंधित बातम्या

BEED : पूराच्या पाण्यानं शेतं झालीत उदध्वस्त, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची आर्त हाक
1

BEED : पूराच्या पाण्यानं शेतं झालीत उदध्वस्त, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची आर्त हाक

India Rain Alert: अखेर पावसाने घेतला ब्रेक! वरूणराजा करणार आराम; ‘या’ राज्यांना सुट्टी नाही
2

India Rain Alert: अखेर पावसाने घेतला ब्रेक! वरूणराजा करणार आराम; ‘या’ राज्यांना सुट्टी नाही

Solapur News : पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावाला आणखी गती मिळणार; जिल्हाधिकाऱ्यांनी मनुष्यबळासह 11 बोटी मागवल्या
3

Solapur News : पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावाला आणखी गती मिळणार; जिल्हाधिकाऱ्यांनी मनुष्यबळासह 11 बोटी मागवल्या

Maharashtra Rain : पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; पुढील दोन ते तीन दिवस…
4

Maharashtra Rain : पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; पुढील दोन ते तीन दिवस…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK: ‘पाकिस्तानचा प्रशिक्षक झालो तर, स्टार…’, भारताकडून धोबीपछाड मिळाल्यानंतर शोएब अख्तरने बांधले हवेत बंगले 

IND vs PAK: ‘पाकिस्तानचा प्रशिक्षक झालो तर, स्टार…’, भारताकडून धोबीपछाड मिळाल्यानंतर शोएब अख्तरने बांधले हवेत बंगले 

”कसंही नाचणं, उड्या मारणं,  विचित्र हावभाव करणं म्हणजे स्त्री व्यक्तिरेखा…” सागर कारंडेची पोस्ट चर्चेत

”कसंही नाचणं, उड्या मारणं, विचित्र हावभाव करणं म्हणजे स्त्री व्यक्तिरेखा…” सागर कारंडेची पोस्ट चर्चेत

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी 2100 कोटी रुपयांची मदत जाहीर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी 2100 कोटी रुपयांची मदत जाहीर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

सार्वजनिक ठिकाणी नेत्यांचे पुतळे उभारण्यास बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सार्वजनिक ठिकाणी नेत्यांचे पुतळे उभारण्यास बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

EV Battery Life: इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी किती वर्षे टिकते? आणि खराब झाल्यावर कुठे वापरली जाते?

EV Battery Life: इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी किती वर्षे टिकते? आणि खराब झाल्यावर कुठे वापरली जाते?

वर्षानुवर्षे व्यवस्थित टिकून राहील चंदेरी साडीचे सौंदर्य! ‘अशी’ घ्या साडीची काळजी, कायमच राहील नव्यासारखी

वर्षानुवर्षे व्यवस्थित टिकून राहील चंदेरी साडीचे सौंदर्य! ‘अशी’ घ्या साडीची काळजी, कायमच राहील नव्यासारखी

“हनुमान म्हणजे राक्षसी देव…”, ट्रम्पच्या निकटवर्तीयाचे वादग्रस्त विधान, टेक्सासमधील मूर्तीवरुन उफाळला वाद

“हनुमान म्हणजे राक्षसी देव…”, ट्रम्पच्या निकटवर्तीयाचे वादग्रस्त विधान, टेक्सासमधील मूर्तीवरुन उफाळला वाद

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha : नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात, वर्ध्यात माताराणीचे स्वागत मोठ्या उत्साहात!

Wardha : नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात, वर्ध्यात माताराणीचे स्वागत मोठ्या उत्साहात!

NAGPUR: नागपूर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी, चेन स्नॅचिंग प्रकरणी टोळीचा पर्दाफाश

NAGPUR: नागपूर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी, चेन स्नॅचिंग प्रकरणी टोळीचा पर्दाफाश

Buldhana News : शेतात पाणी शिरल्याने शेतकरी हवालदिल, हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी

Buldhana News : शेतात पाणी शिरल्याने शेतकरी हवालदिल, हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी

Ahilyanagar : बुऱ्हाणनगर तुळजाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना

Ahilyanagar : बुऱ्हाणनगर तुळजाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना

Parbhani News : शहरात सर्वत्र कचरा, नागरिकांनी कचऱ्यांचे ट्रक भरून महापालिकेच्या आवारात फेकले

Parbhani News : शहरात सर्वत्र कचरा, नागरिकांनी कचऱ्यांचे ट्रक भरून महापालिकेच्या आवारात फेकले

Wardha : हाता तोंडाशी आलेला घास सुद्धा निसर्गाच्या लहरीपणाने नेला हिसकावून; शेतकऱ्यांची आर्त हाक

Wardha : हाता तोंडाशी आलेला घास सुद्धा निसर्गाच्या लहरीपणाने नेला हिसकावून; शेतकऱ्यांची आर्त हाक

Amaravati : अमरावतीत सोयाबीन, कापूस, तूर आणि ज्वारीवर पावसाचा फटका

Amaravati : अमरावतीत सोयाबीन, कापूस, तूर आणि ज्वारीवर पावसाचा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.