
मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा (फोटो सौजन्य-X)
Devendra Fadnavis Ashwini Vaishnaw railway in Marathi: राज्याच्या संस्कृतीशी सहानुभूती दाखवण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रतिष्ठित रेल्वे दौऱ्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावरून भेटायला येतील. हा दौरा सुमारे दहा दिवसांचा असेल असं फडणवीस यांनी माहिती दिली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या रेल्वेच्या योजनांची माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनची घोषणा झाली आहे. या सर्किट ट्रेनद्वारे राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देणं शक्य होणार आहे. या सर्किट ट्रेनने १० दिवस प्रवास करता येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केले. दरम्यान, रेल्वे मंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी योजनेची माहिती दिली. फडणवीस म्हणाले की, मुंबईत अनेक रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. याशिवाय, राज्यात १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. महाराष्ट्रासाठी १ लाख ७३ हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत.
शिवाजी महाराजांचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे त्याठिकाणी रेल्वेची सर्कीट ट्रेन जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेव्ह्स समिट 2025 ला हजेरी लावली होती. मुंबईत वेव्ह्स समिट 2025 होत आहे.
रेल्वेच्या माध्यमातून विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणामधील संपर्क वाढेल. गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केले जाईल. यासाठी केंद्र सरकारने ४८१९ कोटी रुपये दिले आहेत. जर हा मार्ग झाला तर विदर्भाला त्याचा फायदा होईल. तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी ते फायदेशीर ठरेल. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अतिशय विचार करून हा मार्ग पुढे नेला जात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शिवाय दुसऱ्या राज्याच्या सीमेपर्यंत हा मार्ग जात आहे. शिवाय दुर्गम जिल्हा त्याला जोडला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्या बरोबरच इतर भागाचाही त्यातून विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील सुमारे १३२ ठिकाणे विकसित केली जातील, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रात फक्त १३२ स्थानके विकसित केली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही त्यात समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या पदरात दान टाकले आहे. त्यामुळे रेल्वेचे मोठे जाळे आणि सुधारणा होण्यास मदत होणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.