मुंबई – सध्या महाराष्ट्र व कर्नाटक (Maharashtra Karnatak) या दोन राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. तसेच मांगुर हुपरी मार्गावर, संकेश्वर हिटणी मार्गावर, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाके तसेच पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून, ठिकठिकाणी आंदोलन करत कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येत आहे. तर लोकांच्या संतप्त भावना व प्रतिक्रियांचा आगडोंब उसळला आहे.
[read_also content=”मृद व जलसंधारण विभागाच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी पाठबळ – मुख्यमंत्री https://www.navarashtra.com/maharashtra/all-support-for-soil-and-water-conservation-department-cm-eknath-shinde-351706.html”]
दरम्यान, सीमाप्रश्नी राज्यातील गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना (Amit Shah) फोन केला आहे. तसेच फोनवरुन या सीमाप्रश्नी चर्चा केली आहे. दरम्यान, मराठी भाषिकांवर बेळगावमध्ये झालेल्या हल्ल्याचे पडसाद आज संसदीय अधिवेशनात देखील उमटले. तसेच राज्यभर कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना फोनवरुन चर्चा केली आहे. तसेच या प्रश्नी तातडीने लक्ष द्यावे अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री अमित शहांना केली आहे. त्यामुळं केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळं तरी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.