Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम महाराष्ट्रात भाजपची डोकेदुखी वाढणार?; धैर्यशील मोहिते पाटलांकडून माढ्यात प्रचाराला दणक्यात सुरुवात

माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैयशील मोहिते पाटील यांना भाजपनं डावलत पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं धैयशील मोहिते पाटील नाराज होते. दोन दिवसांपूर्वी या नाराजीचं महानाट्य खुद्द भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनाही अनुभवायला मिळालं होतं.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 20, 2024 | 08:48 AM
पश्चिम महाराष्ट्रात भाजपची डोकेदुखी वाढणार?; धैर्यशील मोहिते पाटलांकडून माढ्यात प्रचाराला दणक्यात सुरुवात
Follow Us
Close
Follow Us:

अकलुज / कृष्णा लावंड : माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना भाजपनं डावलत पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं धैयशील मोहिते पाटील नाराज होते. दोन दिवसांपूर्वी या नाराजीचं महानाट्य खुद्द भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनाही अनुभवायला मिळालं होतं. यानंतर मोहिते पाटील यांची नाराजी भाजपला परवडणारी नसल्याचं सांगत याबाबत पक्षश्रेष्टींना बोलणार असल्याचं आश्वासन संतप्त मोहिते समर्थकांना दिल्यावर महाजन यांची सुटका झाली होती.

भाजपकडून मोहिते पाटील यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला, तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी कालपासून माढा लोकसभा मतदारसंघात अनौपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी करमाळा तालुक्यात श्रीदेवीचा माळ, पोथरे, कामोणे, बिटरगावश्री, आळजापूर,खडकी, जातेगाव, पुनवर, वडगाव आणि मांगी या गावात गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायची या मानसिकतेमध्ये असणारे धैयशील मोहिते पाटील समर्थकांकडून शरद पवार यांची तुतारी घेण्याचा आग्रह सुरू असला तरी अद्याप मोहिते पाटील यांनी भाजप सोडण्याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही.

असं असताना कालपासून धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून दौऱ्यासाठी करमाळा येथून सुरुवात केली आहे. यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार असून, प्रश्न सोडवला नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, बारामती, सोलापूर आणि माढा या चार लोकसभा मतदारसंघात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.

मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग

विजयसिंह मोहिते पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्यानंतर त्यांच्या गटाचं नेतृत्व केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शरद पवार यांच्यानंतर सर्वात जास्त कार्यकर्त्यांची फळी जपणारा नेता म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांची ओळख आहे. हेच गणित डोक्यात ठेवून थेट नरेंद्र मोदी याना आणून 2019 मध्ये मोहिते पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. गेल्यावेळी पक्षाने दिलेला उमेदवार म्हणून रणजित निंबाळकर यांना मोठा विजय देऊन राष्ट्रवादीच्या हातातून हा मतदारसंघ मोहिते पाटील यांनी खेचून आणला होता.

पुन्हा निंबाळकर यांनाच संधी दिल्याने मोहिते समर्थक नाराज

यावेळी पहिल्यापासून मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेवर दावा केल्यानंतर त्यांनाच उमेदवारी मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, पक्षाने पुन्हा निंबाळकर यांनाच संधी दिल्याने मोहिते समर्थक नाराज झाले. यानंतर ‘माढा आणि निंबाळकर यांना पाडा’ ही मोहीम समर्थकांनी सुरु केली. आता त्याचा पुढचा अंक म्हणून थेट मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून गावभेट दौऱ्याला सुरुवात करून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.

तर दुसऱ्या बाजूला माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सहापैकी पाच आमदारांनी भाजपने दिलेले उमेदवार रणजित निंबाळकर यांनाच विजयी करण्याचा निर्धार सोमवारी रात्री टेंभूर्णी येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला. मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी झालेल्या महानाट्याचा दुसरा भाग काल टेंभूर्णी येथे पाहायला मिळाला होता.

Web Title: Dhairyasheel mohite patil will contest madha lok sabha election campaigning also started nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2024 | 08:48 AM

Topics:  

  • Lok Sabha 2024
  • Madha Lok Sabha
  • maharashtra
  • political news

संबंधित बातम्या

Neral News : नेरळमधील व्यापारी संकुल लवकरच खुले होणार, १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा
1

Neral News : नेरळमधील व्यापारी संकुल लवकरच खुले होणार, १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा

सरपंच महेश विरले यांचे गैर कारभारावर पांघरून घालणारा कोण? विजय म्हसकर यांचा सवाल
2

सरपंच महेश विरले यांचे गैर कारभारावर पांघरून घालणारा कोण? विजय म्हसकर यांचा सवाल

पावसामुळे शेतकरी हवालदिल! भाताच्या शेतीचे मोठे नुकसान , पाऊस कधी थांबणार?
3

पावसामुळे शेतकरी हवालदिल! भाताच्या शेतीचे मोठे नुकसान , पाऊस कधी थांबणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “मन की बात’ मधून संस्कृत, संस्कृती आणि सेवेचा जागर “
4

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “मन की बात’ मधून संस्कृत, संस्कृती आणि सेवेचा जागर “

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.