
Munde Vs Jarange Patil: "जरांगे हे तुम्हाला महागात..."; धनंजय मुंडेंचे 'त्या' आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
धनंजय मुंडे – मनोज जरांगे पाटील यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
धनंजय मुंडे यांचे जरांगे पाटील यांना चोख प्रत्युत्तर
मुंडे यांनीच माझ्या हत्येचा कट रचल्याचा जरांगे पाटलांचा आरोप
Maharashtra Politics: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्याने राजकीय विश्वात एकच खळबळ राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. धनंजय मुंडे यांनीच माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. आता यावर धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्या आरोपाना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “मी गेली अनेक वर्षे राजकरण आणि समाजकारण करत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यात जे जरांगे पाटील यांचे आंदोलन झाले, त्याला मी सर्वप्रकारे मदत केली. माझे आणि जरांगे पाटील यांचे काहीही वैर नाही.”
पुढे बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. माझी, जरांगे पाटील आणि आरोपींची
ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा. मनोज जरांगे पाटील हे सगळे तुम्हाला महागात पडणार आहे. सभेमध्ये मी EWS चा आणि ओबीसी समाजाचा मुद्दा काढला त्याचा राग आला की चश्मा पाठवला नाही त्याचा राग आला. माझ्यापासून सर्व पृथ्वीलाला धोका आहे असे समजा.”
Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट; दोन संशयित ताब्यात
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्याने राजकीय विश्वात एकच खळबळ राज्यात खळबळ उडाली आहे. जालना पोलिसांनी या प्रकरणात गुरुवारी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, बीड जिल्ह्यातील परळी शहरातील एका प्रमुख आणि प्रभावशाली राजकीय नेत्याचा या कटामागे हात असल्याचा आरोप आहे. २.५ कोटी रुपयांची (२.५ कोटी रुपये) कॉन्ट्रॅक्ट किलिंगची ऑफर देण्यात आल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर मोठा खुलासा करणार आहेत. ते सुपारी देणाऱ्या त्या बड्या नेत्याचे नाव जाहीर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जालना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातील परळी भागातून अमोल खुणे आणि दादा गरुड यांना अटक केली आहे. अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटीलचा जुना सहकारी असल्याचे ओळखले जाते. दादा गरुड हा हत्येच्या नियोजन बैठकांमध्ये सहभागी झाल्याचे नाव असलेला दुसरा संशयित आहे. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की परळी येथील एका प्रमुख नेत्याने हत्येची योजना आखण्यासाठी अनेक बैठका आयोजित केल्या होत्या.
Ans: मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
Ans: जालना पोलिसांनी या प्रकरणात गुरुवारी दोन संशयितांना ताब्यात घेतले