Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाऊस गायब, कडक ऊन अन् सुकलेली पिके; धाराशिवमध्ये सप्टेंबर महिन्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती

Dharashiv: पावसाने पाठ फिरवल्याने आता केवळ पावसाची प्रतीक्षा करण्यापेक्षा संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 15, 2026 | 07:43 PM
१५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अवघा ६०.८ टक्के पाऊस

१५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अवघा ६०.८ टक्के पाऊस

Follow Us
Follow Us:
  • पावसाने दडी मारल्याने धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचे गंभीर सावट
  • ११ ते १७ सप्टेंबरच्या पावसाच्या अंदाजाला तडा
  • १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अवघा ६०.८ टक्के पाऊस
शीतलकुमार शिंदे/Dharashiv: ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने धाराशिव जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण झाले आहे. वेधशाळेसह पंजाब डक यांचेकडून ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, १५ सप्टेंबरपर्यंतच्या प्रत्यक्ष नोंदी पाहता जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला असून, अनेक भागांत उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्याच्या १५ सप्टेंबरपर्यंतच्या पर्जन्यमान अहवालानुसार, जूनपासून आतापर्यंत जिल्ह्याची सामान्य पर्जन्यमानाची सरासरी ५१०.८ मिमी असून प्रत्यक्षात ३१०.७ मिमी पाऊस नोंदला आहे. म्हणजेच सरासरीच्या केवळ ६०.८ टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे १५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील अहवालात दिवसभरात सरासरी केवळ ६.८ मिमी पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यातील काही तालुक्यांची स्थिती तर अधिक चिंताजनक आहे. धाराशिव तालुक्यात जूनपासून आतापर्यंत ५४६.८ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत ३११.१ मिमी म्हणजे ५६.९ टक्के पाऊस झाला आहे. तुळजापूरमध्ये ४९.६ टक्के, परंड्यात ६९.३ टक्के, भूममध्ये ७६.९ टक्के, कळंबमध्ये ७३.९ टक्के, उमरग्यात ५७.४ टक्के, लोहारा तालुक्यात ४४.२ टक्के आणि वाशी तालुक्यात ६६.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

पावसाने दगा दिला, धाराशिवच्या खरीपावर संकट! जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने शेतकऱ्यांची चिंता वाढली

काही मंडळांत परिस्थिती अत्यंत गंभीर

जिल्ह्यातील काही पर्जन्यमापक मंडळांमध्ये पावसाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. धाराशिव तालुक्यातील करजखेड मंडळात जूनपासून आतापर्यंत केवळ १६.५ मिमी, येडशीमध्ये १२५.८ मिमी आणि बेंबळीत १५१.१ मिमी पाऊस झाला आहे. लोहारा तालुक्यातील धनोरी मंडळात केवळ ७ मिमी, तर वाशी तालुक्यातील पारा मंडळात ३ मिमी पाऊस नोंदला गेला आहे.

पावसाच्या या दीर्घ खंडाचा थेट परिणाम जमिनीतील ओलावा, पिकांची वाढ आणि भूजलपातळीवर होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी विहिरी आणि विंधन विहिरींच्या पाणीपातळीत घट होऊ लागल्याने आगामी काळात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

जलसाठ्यांवरही परिणाम
पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही. त्यामुळे आगामी उन्हाळ्यापूर्वीच पाणी नियोजनाचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. पावसाचा खंड आणखी वाढल्यास उपलब्ध जलसाठ्यांवर पिण्याच्या पाण्यासह शेती आणि इतर गरजांचा ताण वाढू शकतो.

यंदा पावसाने सुरुवातीला काही भागांत समाधानकारक हजेरी लावली असली तरी त्यानंतरच्या दीर्घ खंडामुळे एकूण हंगामी पर्जन्यमानाची स्थिती खालावली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या केवळ ६०.८ टक्के पाऊस झाल्याने पावसाळ्याच्या अखेरीस उर्वरित तूट भरून निघण्यासाठी दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे.

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील

शासन-प्रशासनाची कसोटी

पावसाने पाठ फिरवल्याने आता केवळ पावसाची प्रतीक्षा करण्यापेक्षा संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे. उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन, संभाव्य टंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण, पिण्याच्या पाण्याचे पर्यायी स्रोत आणि भूजलपातळीवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

हवामानाच्या अंदाजानुसार पावसाची शक्यता व्यक्त होत असली तरी प्रत्यक्ष पर्जन्यमानात मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित पावसाळ्यात जिल्ह्यात किती पाऊस पडतो, यावर आगामी पाणीस्थिती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. सध्या मात्र अल्प पाऊस, घटती भूजलपातळी आणि अपुरा जलसाठा या तिहेरी संकटामुळे धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे.

Web Title: Dharashiv district faces a looming threat of severe drought due to absence of rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Rain News

संबंधित बातम्या

पावसाने दगा दिला, धाराशिवच्या खरीपावर संकट! जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने शेतकऱ्यांची चिंता वाढली
1

पावसाने दगा दिला, धाराशिवच्या खरीपावर संकट! जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने शेतकऱ्यांची चिंता वाढली

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस
2

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार
3

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…
4

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.