Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. तसेच, पालघर, ठाणे, नंदुरबार आणि नाशिक घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 15, 2026 | 08:19 AM
पावसाच्या सार्वत्रिक हजेरीने दिलासा

पावसाच्या सार्वत्रिक हजेरीने दिलासा

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. ऑगस्टनंतर पावसाने उघडीप घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी उन्हाचा कडाका देखील अनुभवत आहे. असे असताना आता विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

यंदा अल निनोच्या संकटामुळे पावसाने सुरुवातीपासूनच हुलकावणी दिली. जूनमध्ये उशिराने झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला. पिके ऐन वाढीच्या अवस्थेत असतानाच पुन्हा पावसाने दडी मारली. हा खंड तब्बल ४५ दिवसांचा ठरला. त्यामुळे अनेक भागांतील पिकांवर रोगराई पसरली, तर काही ठिकाणी पिके कोमेजण्याच्या मार्गावर होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसाने कापूस आणि तूरपिकाला संजीवनी मिळाली आहे.

ऑगस्टच्या उत्तरार्धात आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाने दिलेली ओढ तसेच उन्हाळ्यासारखे तापलेले ऊन यामुळे हलक्या व उतारावरील जमिनीतील सोयाबीनचे पीक वाचविणे कठीण झाले होते. आता पाऊस झाला असला तरी अनेक भागांतील सोयाबीन पूर्णपणे वाळले आहे. ओलावा टिकून राहिल्याने पिकांची स्थिती समाधानकारक आहे. मात्र, झालेला पाऊस पुरेसा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अनेक ठिकाणी पावसाचा ‘यलो अलर्ट’

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. तसेच, पालघर, ठाणे, नंदुरबार आणि नाशिक घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान

सध्या अकोलेकरांचे लक्ष काटेपूर्णा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्राकडे लागले असून, तेथे दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचे झालेले नुकसान या पावसामुळे भरून निघणे शक्य नाही. तसेच, एवढ्याशा पावसामुळे बोअरवेल तसेच भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होण्यास फारशी मदत होणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.

धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष

अकोला शहराला याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणात केवळ २१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी

Web Title: Possibility of heavy rainfall in many parts of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Himalayan Crisis : हिमालयाचा ‘काऊंटडाऊन’ सुरू? हिमनद्या वेगाने वितळल्याने लाखो लोक धोक्यात
1

Himalayan Crisis : हिमालयाचा ‘काऊंटडाऊन’ सुरू? हिमनद्या वेगाने वितळल्याने लाखो लोक धोक्यात

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार
2

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…
3

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…

Weather Update : राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…
4

Weather Update : राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.