Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: धाराशिव जिल्हा येतोय हरित ऊर्जेच्या नकाशावर, १,४२० मेगावॅट वीज निर्मिती, आणखी ४८३ मेगावॅट प्रकल्प मार्गावर

दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने हरित ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. सध्या जिल्ह्यात सौर, पवन आणि बगॅसवर आधारित १,४२०.९९ मेगावॅट वीज निर्मिती क्षमता कार्यरत असून, आणखी ४८३.७० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे धाराशिव राज्यातील महत्त्वाचे हरित ऊर्जा केंद्र म्हणून उदयास येत...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 18, 2026 | 03:43 PM
धाराशिव जिल्हा येतोय हरित ऊर्जेच्या नकाशावर, १,४२० मेगावॅट वीज निर्मिती, आणखी ४८३ मेगावॅट प्रकल्प मार्गावर

धाराशिव जिल्हा येतोय हरित ऊर्जेच्या नकाशावर, १,४२० मेगावॅट वीज निर्मिती, आणखी ४८३ मेगावॅट प्रकल्प मार्गावर

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळग्रस्त धाराशिवची हरित ऊर्जेकडे झेप
  • १,४२० मेगावॅट वीज निर्मिती
  • आणखी ४८३ मेगावॅट प्रकल्प मार्गावर
 

शीतलकुमार शिंदे, धाराशिव : दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने आता हरित ऊर्जेच्या क्षेत्रातही उल्लेखनीय झेप घेतली आहे. सूर्यप्रकाश आणि वाऱ्याच्या नैसर्गिक संपत्तीचा प्रभावी वापर करत जिल्ह्यात सौर, पवन आणि बगॅसवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उभारले जात आहेत. सध्या जिल्ह्यात १,४२०.९९ मेगावॅट इतकी हरित ऊर्जा निर्मिती क्षमता कार्यान्वित असून, आणखी ४८३.७० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प विविध टप्प्यांवर प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे आगामी काळात धाराशिव हा मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील महत्त्वाच्या हरित ऊर्जा केंद्रांपैकी एक म्हणून उदयास येण्याची चिन्हे आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने ११.४६ लाखांची सायबर फसवणूक; धाराशिव सायबर पोलिसांत गुन्हा

जिल्ह्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार सौर ऊर्जेची स्थापित क्षमता ६३३.७९ मेगावॅट इतकी आहे. त्यामध्ये ओपन ॲक्सेस व महावितरण विक्रीसाठी ४१६.११ मेगावॅट, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (एमएसकेव्हीवाय) अंतर्गत १८.६९ मेगावॅट, तर एमएसकेव्हीवाय २.० अंतर्गत १९९.०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यरत आहेत. यामुळे जिल्ह्यातील ऊर्जा निर्मितीत सौर ऊर्जेचा मोठा वाटा निर्माण झाला आहे.

पवन ऊर्जेतही दमदार आघाडी

धाराशिव जिल्ह्यातील डोंगराळ व मोकळ्या परिसराचा लाभ घेत पवन ऊर्जा प्रकल्पांचीही मोठ्या प्रमाणावर उभारणी करण्यात आली आहे. सध्या पवन ऊर्जेची एकूण क्षमता ६३२.२० मेगावॅट इतकी आहे. यामध्ये टीपी सौर्या प्रा. लि. (लोहारा) – १०२.६० मेगावॅट, जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जी – ९९.०० मेगावॅट, टॉरेंट सोलारजेन (लोहारा) – ९७.२० मेगावॅट, रिन्यू वायू ऊर्जा – ७६.०० मेगावॅट, टॉरेंट सोलारजेन (तुळजापूर) – ७६.०० मेगावॅट, तसेच जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जी थ्री – १२०.०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यरत आहेत. उर्वरित प्रकल्पांसह जिल्ह्याची पवन ऊर्जा क्षमता ६३२.२० मेगावॅट झाली आहे.

साखर कारखान्यांकडूनही १५५ मेगावॅट वीज

उसाच्या बगॅसपासून वीज निर्मितीतही धाराशिव मागे नाही. जिल्ह्यातील साखर कारखान्यांमधून १५५.०० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता उपलब्ध आहे. यामध्ये अयान मल्टिट्रेड एलएलपी – ३२ मेगावॅट, क्विनर्जी इंडस्ट्रीज – ३२ मेगावॅट, लोकमंगल माऊली साखर कारखाना – ३० मेगावॅट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना – १६ मेगावॅट, कांचेश्वर शुगर – १५ मेगावॅट, तसेच इतर साखर कारखान्यांच्या को-जनरेशन प्रकल्पांचा समावेश आहे.

आणखी ४८३.७० मेगावॅटची भर पडणार

धाराशिवच्या ऊर्जा क्षमतेत लवकरच मोठी वाढ होणार आहे. ४८३.७० मेगावॅट क्षमतेचे सौर व पवन ऊर्जा प्रकल्प सध्या ईएचव्ही (अतिउच्च दाब) वीजजाळ्याशी जोडणीच्या प्रक्रियेत आहेत. यामध्ये जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जी थ्री – २००.७० मेगावॅट, टाटा पॉवर एनर्जी – १०१.०० मेगावॅट, ज्युनिपर ग्रीन ईटीए फाईव्ह – ७५.०० मेगावॅट (सौर) व २६.०० मेगावॅट (पवन), जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जी कोटेड टू – ४०.०० मेगावॅट, जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जी सिमेंट – १५.०० मेगावॅट, तसेच ज्युनिपर ग्रीन पॉवर फाईव्ह – २६.०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याची एकूण हरित ऊर्जा क्षमता १,९०० मेगावॅटच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.

तुळजापूर-लोहारा बनले हरित ऊर्जा पट्टा

तुळजापूर, लोहारा, उमरगा, भूम, कळंब, परंडा आणि धाराशिव तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सौर व पवन ऊर्जा प्रकल्प उभारले गेल्याने हा परिसर आता हरित ऊर्जा पट्टा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या प्रकल्पांमुळे राज्याच्या वीज निर्मितीत भर पडत असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास आणि गुंतवणुकीलाही चालना मिळत आहे. ऊर्जा क्षेत्रातील ही वाढ लक्षात घेता, पारंपरिक दुष्काळी जिल्ह्याची ओळख बदलत धाराशिव आता स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीचे नवे केंद्र म्हणून वेगाने पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे.

येडशीजवळ गळा चिरून खून; अनैतिक संबंधाच्या संशयातून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या! बार्शीच्या संशयितावर गुन्हा दाखल

Web Title: Dharashiv emerges as green energy hub 1420 mw renewable power generation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात
1

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता
2

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस
3

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा
4

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.